माणगाव तालुक्यात शासनाच्या नियमांची सरपंच व ग्रामस्थांकडून पायमल्ली कलम १४४ असून देवकुंड धबधब्यावर पर्यटकांची अफाट गर्दी…

प्रतिनिधी :-सचिन पवार
माणगांव -रायगड:- माणगांव तालुक्यातील देवकुंड धबधबा येथे पर्यटकांकडून होत असलेल्या लाखोंच्या वसुली मध्ये शासकीय अधिकाऱ्यांच्या हीषषेदारीसाठी तर नाही ठेवले शासनाचे निर्बंध धाब्यावर ?कोकणात पावसाळ्यामध्ये डोंगर दऱ्यातून वाहणारे धबधबे पर्यटकांना आकर्षक ठरतात यामध्ये माणगाव तालुक्यातील भिरा , विळा सणसवाडी येथील देवकुंड व सीक्रेट पॉईंट अति सुंदर व नयनरम्य धबधबे असल्याने येथे पर्यटकांची सतत गर्दी पाहाव्यास मिळते.
दि.३ जुलै २२ रोजी एका २४ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाला होता व धबधब्यांचे आकर्षण अनेकांच्या जीवावर बेतल्यामुळे अखेर शासनाकडून देवकुंड व सीक्रेट पॉईंट व आजूबाजूच्या एक किलोमीटर परिसरातील पर्यटनाच्या ठिकाणी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम (१) व (४) नुसार प्रतिबंधात्मक आदेश लागू असताना देखील देवकुंड व सीक्रेट पॉईंट धबधब्यांवर पर्यटकांची तोबा गर्दी पाहाव्यास मिळत आहे.
देवकुंड धबधब्यावर पोहचण्यासाठी जंगलातून ७ ते ८ किलोमीटर पायी प्रवास करणे अवश्यक आहे अश्यात धोकादायक वेडे वाकडे वळण व डोंगराळ रस्त्यामुळे पर्यटकांना दुखापत झाल्यास किंवा अनिश्चित घटना घडल्यास , पर्यटकांना तात्काळ मदत मिळणे अशक्य आहे.
तरीही शासनाकडून कलम १४४ लागू असून देखील हे धबधबे पर्यटकांसाठी खुले ठेवून शासनाच्या नियमांची बिनधास्तपणे पायमल्ली केली जात आहे.
देवकुंड धबधब्यावर जाण्यासाठी ग्रामपंचायत पाटणूस प्रत्येकी पर्यटकांकडून स्वच्छतेच्या नावाखाली २० रुपये आकारत आहे . स्वच्छता मात्र शून्य दिसत आहे, तसेच प्रत्येकी पर्यटकांकडून १०० रुपये वसुल केले जात आहेत व पार्किंग २०० रुपये वसुल करण्यात येत आहे.
त्यामुळे आश्चर्य हे कि १४४ कलम लागू असून स्थानिक सरपंच व ग्रामस्थ दररोज वसुल करत असलेल्या लाखोच्या कमाई मध्ये शासकीय अधिकाऱ्यांची भागीदारी तर नाही ना असा प्रश्न निर्माण होत आहेत.
निर्बंध लागू असलेल्या ठिकाणी दर रोज हजारोंच्या संख्येने पर्यटक दाखल होत आहेत मात्र प्रांत कार्यालय माणगाव व पोलीस प्रशासन बघ्याची भूमिका का बजावत आहेत असे प्रश्न निर्माण होत आहेत.
प्रशासनाच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्या विरोधात आता प्रशासन काय कारवाई करणार याकडे पर्यटकांच्या सुरक्षा दृष्टीने प्रश्न निर्माण होत आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com