माणगांव तालुक्यातील सर्व शालेय परिवहन समितीची प्रथम सभा माणगांव शिक्षण प्रसारक मंडळाचे सुधाकर नारायण शिपूरकर स्कूल येते संपन्न…

प्रतिनिधी :-सचिन पवार
माणगांव रायगड

माणगांव :-शासन परिपत्रक नियम क्र. ५(२) मधील तरतुदी नुसार शालेय मुलाची ने आण सुरक्षिपणे करणे याकरिता प्रथम सभेचे आयोजन माणगांव तालुक्यातील सुधाकर नारायण शिपूरकर इंग्लिश मेडीयम स्कूल कचेरी रोड माणगांव येथे आयोजित केली होती यावेळी उप प्रादेशिक परिवहन पेण चे मोटार वाहन निरीक्षक सूर्यकांत गंभीर, सहाय्यक मोटार निरीक्षक नंदन राऊत, सहाय्यक मोटार निरीक्षक युवराज उकले, माणगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे, माणगांव वाहतूक शाखेच्या प्रतिनिधी विमल ठाकूर मॅडम, माणगांव शिक्षण प्रतिनिधी शिंदे, शिपूरकर स्कूल च्या मुख्याध्यापिका मनीषा मोरे मॅडम, सर्व शालेय समितीचे अध्यक्ष, पालक प्रतिनिधी, स्कूल बस चालक मालक, स्कूल बस मदतनीस व पत्रकार सचिन पवार या बैठकी करिता उपस्थित होते यावेळी प्रथम सुधाकर नारायण शिपूरकर स्कूल च्या मुख्याध्यापिका मनिषा मोरे मॅडम यांनी माणगांव पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे साहेब, मोटार वाहन निरीक्षक सूर्यकांत गंभीर साहेब, मोटर वाहन सहाय्यक निरीक्षक नंदन राऊत व मोटार वाहन सहाय्यक निरीक्षक युवराज उकले साहेब यांच पुष्पगुछ देऊन स्वागत केले. व पुढील कार्यक्रमाला सुरुवात केली यावेळी मोटार वाहन सहाय्यक निरीक्षक युवराज उकले व नंदन राऊत यांनी स्कूल समिती 2025/26 याकरिता शालेय मुलाची ने आण सुरक्षित पणे करणे याकरिता मोलाचे मार्गदर्शन दिले.
महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेमध्ये शालेय विद्यार्थी परिवहन हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. परिवहन व्यवस्थेला शिस्त व दिशा प्राप्त करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभाग व परिवहन विभागाने काही नियमावली निश्चित करून महाराष्ट्रातील सर्व शालेय परिवहनासाठी लागू करण्याचा निर्णय घेतला. शालेय परिवहन समिती जिल्हा स्तर महानगरपालिका स्तर व शालेय स्तरावर गठीत करण्याचा निर्णय यांच परिपत्रकद्वारे घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने विदयार्थ्यांची सुरक्षितता व सुरक्षित वाहतूक व्यवस्था नियंत्रित ठेवण्यासाठी शालेय परिवहन समिती असणे बंधनकारक करण्यात आली आहे. या समिती संघटनाचा उद्देश विद्यार्थ्यांची ने आण सुरक्षित करणे अवैध वाहतुकीवर आळा बसविणे व वाहतूक नियमाचे उल्लंघन टाळणे याबरोबर शालेय परिवहन समितीची कार्य मुलांना समुपदेशन व सुरक्षा जागृती करणे शाळेतील मुलांना दररोज सुरक्षितपणे ने आण करणे बस थांबे, वाहनाची कागदपत्रे नोंदणी प्रमाणपत्र वय विमा परवाना वायू प्रदूषण, नियंत्रण प्रमाणपत्र, वाहन चालवण्याचा परवाना,चालक मदतनीस, प्रथमोचार पेटी इत्यादी बाबी तपासणे व मगच अश्या वाहनास परवानगी ची शिफारस करणे या सर्व बाबीवर अतिशय सूक्ष्मनिरीक्षण ठेवण्यासाठी मार्गदर्शक म्हणून या समितीचे असणे खूप आवश्यक आहे.