माणगांव शिक्षण प्रसारकं मंडळ CBSC इंग्लिश मेडीयम स्कूलचे भूमिपूजन समारंभ महायुतीचे नेते यांच्या उपस्थितीत पार..

प्रतिनिधी :-सचिन पवार
रायगड : माणगांव:- माणगांव निजामपूररोड येथील अमित कॉम्प्लेक्स समोर माणगांव शिक्षण प्रसारकं मंडळाचे CBSC स्कूलचे भुमिपूजन मा. ना. उदय सामंत साहेब उद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री रायगड रत्नागिरी जिल्हा यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी मा. ना.रवींद्र चव्हाण सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य, मा. सुनिल तटकरे खासदार रायगड -रत्नागिरी जिल्हा लोकसभा , मा. ना. आदिती तटकरे महिला व बालविकास मंत्री महाराष्ट्र राज्य, मा. भरतशेठ गोगावले आमदार महाड माणगांव पोलादपूर विधानसभा यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला.
भूमिपूजन झाल्यानंतर पुढील कार्यक्रमाची जाहीर सभा अशोक दादा साबळे विदयालय येथे आयोजित केली होती यावेळी प्रमुख उपस्थिती अलिबाग मुरुड विधानसभा आमदार महेंद्र दळवी, कर्जत खालापूर विधानसभा आमदार महेंद्र थोरवे, आमदार विधानसभा अनिकेत तटकरे, भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील, शिवसेना दक्षिण जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, शिवसेना माणगांव तालुका प्रमुख महेंद्र मानकर, माणगांव नगरध्यक्ष ज्ञानदेव पवार, उप नगराध्यक्ष राजेश मेहता माणगांव सरचीटणीस शेकाप रमेश मोरे हे उपस्थित होते.

यावेळी रवींद्र चव्हाण यांनी माणगांव हे रायगड जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण आहे त्यामुळे माणगांवला जिल्ह्याचा दर्जा मिळाला पाहिजे असे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी अशोकदादा साबळे विद्यालय येथे झालेल्या विविध विकासकामाच्या भूमिपूजनच्या वेळी जाहीर सभेत संबोधित केले.
तसेच पुढील येणाऱ्या 2024 च्या निवडणुकीत अँड राजीव साबळे यांना आमदार बनण्याची इच्छा आम्ही तिघेही पूर्ण करू असा विश्वास चव्हाण यांनी माणगांवकराना दिला.
यावेळी तीन मंत्री तीन पक्ष एकत्रित आले होते.माणगांवच्या विकासासाठी नेहमी सकारात्मक भूमिका आमच्याकडून घेण्यात आली व ती यां पुढे ही घेण्यात येईल आ. भरत गोगावले म्हणाले की राज्यात महायुती सरकारच्या माध्यमातून विकासकामे जलद गतीने होत आहेत माणगांव च्या विकास कामासाठी जेवढा निधी लागेल तेवढा निधी देण्यात येईल. माणगांवचा विकास आराखडा मंजूर करण्याची सर्वस्वी जबाबदारी आम्हा तिन्ही नेत्यांची राहील व अँड. राजीव साबळे जिथे विकास कामाला हाथ घालतात तिथे सोन होत यां कामाचे उदघाट्न देखील आम्ही एकत्रिपणे करू असे तिन्ही मंत्र्यांनी सांगितले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com