माणगांव पोलिसांची उत्तम कामगिरी हरवलेल्या बालकाचा शोध घेऊन सुखरूप केले पालकांच्या हवाली….

प्रतिनिधी :-सचिन पवार
माणगांव रायगड
माणगांव :-माणगांव शहरातील मोर्बा रोड येथील पोस्ट ऑफिस शेजारी राहणाऱ्या राहुल बेचैन गुप्ता यांचा अडीच वर्षाचा मुलगा हा रात्री ९.३० वाजता घरातून गायब झाल्याचे समजतात त्यांनी आजू बाजूला शोध घेतला परंतु त्याचा ठाव ठिकाणा लागला नाही म्हणून त्यांनी माणगांव पोलीस ठाण्यात धाव घेतली व झालेला सर्व प्रकार माणगांव पोलीस ठाण्यात सांगितलं यां परिस्थितीचा गाभीर्य ओळखून माणगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस ठाण्याचे पथक तयार करून पोलीस हवालदार जाधव पोलीस शिपाई रामनाथ डोईफोडे पोलीस शिपाई मयूर पाटील पोलीस शिपाई साबळे पोलीस शिपाई सोनकांबळे यांनी हरवलेल्या मुलाचा शोध चालू केला.

सदर हरवलेला मुलगा कुमार जिंगर राहुल गुप्ता हा नक्की गेला कुठे यांचा तपास माणगांव पोलीस करीत असताना त्यांना हा रात्री १०.१५ वाजता माणगांव एस टी स्टँड येथे आढळून आला व हरविलेल्या अडीच वर्षाच्या मुलाला घेऊन माणगांव पोलीस ठाणे येथे आणून बालकाचे वडील राहुल गुप्ता याच्याशी संपर्क साधला ही माहिती समजतात आपला जिगराचा तुकडा सहीसलामत सापडल्याने मुलाचे आई वडीलाचे आनंदाश्रू वाहू लागले .व सदर हरविलेल्या मुलास माणगांव पोलिसांनी आई वडीलाच्या ताब्यात बालकास सुखरूप दिले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com