माणगांव मध्ये कंटेनर खाली चिरडून रफीक जामदार या तरुणाचा जागीच मृत्यू..!

प्रतिनिधी- संजय जाधव
माणगांव ;
माणगांव मध्ये मुंबई गोवा हायवेवर जुने माणगांव येथील तीन बत्ती नाका येथे २० मार्च रोजी सकाळी ११:१५ च्या दरम्यान महाड बाजूकडून मुंबई बाजूकडे जाणारा कंटेनर क्रं आर जे १९ जी जी ०५७० ह्या कंटेनर च्या मागच्या टायरखाली येऊन जुने माणगांव येथील राहणारा रफीक जामदार वय वर्षे ३९ हा तरुण आपल्या ताब्यातील हिरो होंडा फॅशन प्लस क्रं एम एच ०५ वाय ४४८२ घेवुन जात असताना तीन बत्ती नाका येथे कंटेनरच्या मागील टायर खाली येऊन चिरडून रफिक जामदार याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
रफिक जामदार हा जुने माणगांव येथील रहिवासी असून व्यवसायाने इलेक्ट्रिशन प्लबिंग,एसी फ्रीज मेकॅनिक म्हणून कार्यरत होता.तसेच रफिक जामदार हा "आपदा मित्र"म्हणून माणगांव मध्ये साळुंखे रेस्क्यू टीम मध्ये देखील कार्यरत होता.रफिक च्या पश्चात पत्नी व दोन मुली असा परिवार आहे.माणगांव मध्ये सतत ची वाहतूक कोंडी यामुळे या अपघातानंतर संतप्त जमावाने आक्रमक भूमिका घेत रस्ता रोको करण्याचा प्रयत्न झाला.घटनास्थळी माणगांव पोलीस ठाणे टीम, माणगांव वाहतूक पोलीस शाखा,महामार्ग पोलीस यांच्या मदतीने वाहतूक सुरळीत करण्यात आली .