सर्प जातीचे मांडुळची १ कोटी १० लाख किंमतीला तस्करी करण्यासाठी घेवुन जाणा-या टोळीस तळबीड पोलीस ठाणे यांनी केली जेरबंद…

उपसंपादक-रणजित मस्के
सातारा : मा. पोलीस अधिक्षक सो सातारा व अप्पर पोलीस अधिक्षक सो सातारा तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी साो कराड विभाग कराड यांनी अगामी येणारी शिवजयंती तसचे निवडणुकीच्या अनुषंगाने हायवेला सक्त पेट्रालिंग करण्याचे सुचना दिले होत्या.

त्याप्रमाणे काल दि- १६/०२/२०२४ रोजी सायंकाळी तळबीड पोलीस ठाणे कडील स्टॉफ पेट्रालिंग करीत असताना स.पो.नि भोसले व पो.कॉ-निलेश विभुते यांना खात्रीशिर माहीती मिळाली की, कराड ते सातारा जाणारे हायवे वरती मौजे वराडे या गावमध्ये जय शिवराय हॉटेल जवळ काही लोक बेकायदेशीर सर्प जातीची मांडुळ विक्रीसाठी घेवुन येणा-या आहेत अशी खात्रीशिर माहीती मिळाण्याने तळबीड पोलीस ठाणेकडील पोलीस स्टॉप यांनी जयशिवराय हॉटेल आजुबाजुस सापळा लावुन दाँच करीत असताना रात्री २१.०० वा. चे सुमारास तीन इसम मोटार सायकलवरुन जय शिवराय हॉटेल समोरील रिकाम्या जागेत येवुन थांबले होते.
त्याच्या हालचाली संशयीत बाटल्याने व बामतीदाराने दिलेल्या वर्णना प्रमाणे त्यांचे वर्णन होते. म्हणुन तळबीड पोलीस ठाणेकडील पोलीस स्टॉपने त्यांना घेराव घालुन ताब्यात घेवुन नांव पत्ता विचारता त्यांचे नांव
१) रुपेश अनिल साने वय-२५ रा आठ ता पोलादपुर जि रायगड
२) अनिकेत विजय उत्तेकर वय-२७ रा कापडखुर्दे ता पोलादपुर जि रायगड
३) आनंद चंद्रकांत निकम वय-३५ रा कापडखुर्दे ता पोलादपुर जि रायगड असे सांगीतले त्यांचे जवळील एका पुडयाच्या बॉक्सची तपासणी केली असता. त्यामध्ये सर्प जातीचे मांडुळ मिळुन आले.
सदर बाबत वराडे येथील वनपाल सागर कुंभार यांनी मांडुळ असल्याचे खात्री करुन सांगितली. त्यांचेकडे विचारपुस करता त्यांनी मांडुळ हे आनंद चंद्रकांत निकम यांस शेतात काम करीत असताना दहा दिवसापर्वी मिळुन आले. असुन ते आम्ही एक कोटी दहा लाख रुपये या किंमतीला विक्रीसाठी घेवुन जात होतो. त्या तिद्यांविरुध्द तळबीड पोलीस ठाणेस वन्यजीव प्राणी अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करणेत आला असुन त्यांना अटक केली आहे. व वनपरिक्षेत्र अधिकारी कराड यांचे कडे सुरक्षेतेच्या दृष्टीने सदरचे मांडुळ त्यांचे ताब्यात देण्यात आले आहे. अटक आरोपी यांचेकडे अधिक तपास चालु आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री समीर शेख मा अप्पर पोलीस अधिक्षक आंचल दलाल मा उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक श्री किरण भोसले, श्रेणी पो.उ.नि अशोक मदने तळबीड पोलीस ठाणेचे सहा. पोलीस फौजदार काळे, खराडे पोहेकों/आप्पा ओंबासे/पो.ना भोसले, संदेश दिक्षीत, पो.कॉ. निलेश विभुते, सुशांत कुंभार, महेश शिंदे यांनी केली आहे. सदरचा गुन्हा उघडकीस आणणे कामी उत्कृष्ट कामगिरी केली म्हणून पोलीस अधीक्षक सातारा यांनी सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com