मांढरदेव गडावर दानपेटीतील रक्कम व दागिणे चोरणारे आरोपी अटक…

प्रतिनिधी-रणजित मस्के

वाई: श्री. चंद्रकांत नामदेव मांढरे वय ३७ वर्षे धंदा होलसेलर, विश्वस्त मांढरदेव देवस्थान रा. मांढरदेव ता. वाई जि. सातारा यांनी तक्रार दिली आहे की, दिनांक १२ / १२ / २०२२ रोजी सकाळी ०९.३० ते १६.४५ वाजण्याच्या दरम्यान मांढरदेव ता. वाई जि. सातारा गावच्या हद्दीत मांढरदेवी गडावर असलेले मांढरदेवी ट्रस्टच्या कार्यालयात दानपेटीतील मिळालेल्या देणगीच्या पैशाची व दाग दागिण्यांची मोजणी चालू असताना मोजणी करीता आलेले बॅकेचे सेवानिवृत्त कर्मचारी यांनी मशिनवर पैसे मोजताना १,२०,८४० /- रुपये, ५०००/- रु. किंमतीचे पाच पिवळया धातूचे मनी, एक पिवळया धातूची नथ एक काळया मन्यांची पोथ त्यामध्ये दोन पिवळया धातूचे मनी तसेच मांढरदेव ट्रस्टचे कर्मचारी सहसचिव यांनी २३.३८० /- रुपये, शिपाई याने १५,०००/- रुपये असे एकुण १,६४,२२०/- रुपयांची रोख रक्कम व सोन्याचे दागिणे चोरुन नेले आहेत अशी तक्रार दिल्याने गुन्हा रजिष्टरी दाखल करण्यात आलेला आहे.
मांढरदेवी ट्रस्टच्या वतीने माढरदेवी मंदिराचे समोर असलेल्या दानपेटी उघडल्यानंतर त्यातील रोख रक्कम मशिनवर मोजण्या करीता बँकेतील सेवानिवृत्त कर्मचारी यास ट्रस्टच्या लोकांनी बोलावले होते त्याने रक्कम मोजत असताना त्यामधिल रोख रक्कम व सोन्याचे दागिण्यांची चोरी करुन त्याचे मारुती वॅगानार कारमध्ये नेवून ठेवत होता. त्यास ट्रस्टचे विश्वस्त व कर्मचा-यांनी पकडलेले होते. त्यानंतर तेथिल कर्मचा-यांची व तेथिल रोख रक्कमेची पडताळणी केली असता मांढरदेवचे सह सचिव व ट्रस्टचे शिपाई यांचे ताब्यात दान पेटीतील चोरलेली रोख रक्कम मिळून आलेली होती. सदर बाबत वाई पोलीस स्टेशनला गु.र.नं.४७८/२०२२ भा.द.वि.स.कलम ३७९.३८१,३४ प्रमाणे गुन्हा दाखल असून यामध्ये दोन आरोपींना अटक करण्यात आले असून त्यांना दिनांक १३ / १२ / २०२२ रोजी मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, वाई यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांनी आरोपींची दिनांक १७ / १२ / २०२२ रोजी पर्यन्त पोलीस कोठडी अभिरक्षा मंजूर केलेली आहे.
पोलीस कोठडी अभिरक्षा मुदतीत अटक आरोपीच्याकडे विचारपूस करुन त्यांच्या रहात्या घराच्या घरझडत्या घेतल्या असता त्यांच्या घरामध्ये मांढदरेव देवीला भाविकांना अर्पण केलेल्या सोन्याच्या नथी, मनी व इतर दागिणे, तांब्याची भांडी, पितळेच्या समई, पंचारती व घंटा, साडया व ब्लाउज पीस तसेच हळद कुंकु लागलेली रोख रक्कम मिळून आली असून गुन्हयाच्या तपासकामी सुमारे १३,७५,०००/- रुपयांचे साहीत्य जप्त करण्यात आलेले आहे.
अटक आरोपींनी चोरलेले पैशाचे काय केले, तसेच त्यांचे आणखी साथीदार आहेत काय याबाबत तपास चालू आहे.
श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक, सातारा व श्री. बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती शितल जानवे खराडे, उप विभागीय पोलीस अधिकारी वाई विभाग यांनी मांढरदेवी येथे चोरी करणारे आरोपींच्याकडे सखोल तपास करुन यामध्ये सहभागी असणारे सर्व आरोपींच्यावर कडक कारवाई करणे बाबत सुचना दिलेल्या आहेत.
सदर गुन्हयाचा तपास श्री. बाळासाहेब भरणे, पोलीस निरीक्षक वाई पोलीस स्टेशन यांच्यासह श्री. रविंद्र तेलतुंबडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक व गुन्हे प्रकटीकरण विभागाचे कर्मचारी पो. हवा. विजय शिर्के, सोनाली माने, पो. ना. अजित जाधव, पो. कॉ. किरण निंबाळकर, श्रवण राठोड, प्रसाद दुदुस्कर, अमित गोळे हे करीत आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com