मंडणगड पणदेरी लोकरवण मार्गे बोरीवली नालासोपारा एसटी सेवा अखेर प्रवाशांच्या सेवेत…

0
Spread the love

संपादिका – दिप्ती भोगल

मंडणगड:-शुक्रवारी दिनांक २२/०३/२०२४ रोजी पासून मंडणगड, घोसाळे, बहिरीवली, कोंडगाव, दंडनगरी, पणदेरी, पेवे, पडवे, उंबरशेत, लोकरवण, म्हाप्रळ, आंबेत, दाभोळ, टोळ फाटा, मार्गे पनवेल, सायन, बोरीवली, नालासोपारा. एसटी सेवा सुरू झाली आहे प्रवाशांना पुन्हा पुन्हा विनंती आहे की, गेले अनेक वर्षे या भागातील नागरिकांची मागणी होती. ती पूर्ण करण्यासाठी अथक परिश्रम व निष्ठेने प्रयत्न केले गेले.

सदर एसटी सेवा ही कायमस्वरूपी टिकवण्यासाठी कृपया प्रवाशांनी आरक्षणावर जस्त भर द्यावे. व जास्तीत जास्त प्रवासी मिळतील याची काळजी घ्यावी. यासाठी अनेक वेळा आपल्याला सूचना देण्यात व निवेदन करण्यात आले आहे. आपण समजूतदार आहात.. सदर एसटी ही आपल्या घोसाळे पासून ते अगदी दाभोळ टोळ फाटा पर्यंत अनेक गावं व वाड्या वस्तीतून प्रवास करत जाणार आहे. आणि या मार्गावर नालासोपारा एसटी सेवेची अत्यंत महत्त्वाची व मोठ्या प्रमाणावर गरज होती, आणि आहे. म्हणून या परिसरातील बहुतांश ग्राम पंचायती कडून सेवा कायमस्वरूपी करण्यासाठीचे ठराव मंजूर केले आहेत. आणि ते लवकरच म्हणजे येत्या सोमवार पर्यंत मंडणगड आगार व्यवस्थापक व एसटी महामंडळ विभागीय कार्यालय रत्नागिरी यांच्या कडे सादर केले जातील.

ही काळजी मी स्वतः घेतलेली आहे. येवढ सारं असून देखील गाडी कायमस्वरूपी टिकवण्यासाठी जास्त गरज आहे ती प्रवाशांची. याची काळजी आपण सर्व या मार्गावर प्रवास करणाऱ्या व मुंबई उपनगरात रहाणाऱ्या या भागातील नागरिकांनी घ्यावी अशी माझी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती आहे. तरच ही सेवा कायमस्वरूपी सुरू ठेवण्यात मदत होईल आणि तुमच्या आमच्या सारख्या गोर गरीब जनतेचा फायदा व सोय होईल. धन्यवाद.

परिसरातील विकास.. हेच एकमेव मनात ध्येय आणि ध्यास.

अशी माहिती आपला विश्वासू,
जमीर माखजनकर.
सामाजिक कार्यकर्ता व सचिव- रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटी यानी दिली.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट