मामाकडुन 1 कोटी रूपयांची खंडणी घेणा-या भाच्याला ठाणे खंडणी विरोधी पथकाने ठोकल्या बेड्या..

उपसंपादक-रणजित मस्के
ठाणे :-तक्रारदार सुभाश रामचंद्र तुपे, वय -59 वर्शे, धंदा – सेवानिवृत्त, रा. रूम नंबर 201, सुमीत एन्क्लेव्ह सीएचएस, संत ज्ञानेष्वर मार्ग, टीएमसी आॅफीसचे पाठीमागे, पाचपाखाडी, ठाणे हे मुख्य अभियंता एम.आय.डी.सी. मधुन सेवानिवृत्त झालेले आहेत. तसेच त्यांची पत्नी सौ जयश्री सुभाश तुपे यांनी कार्यकारी अभियंता एम.आय.डी.सी विभागातुन राजीनामा दिलेला आहे. आरोपी मंगेष अरूण थोरात, वय – 29 वर्शे, रा. प्लाॅट नंबर 106, प्रेमकंुज अपार्टमेट, पाईपलाईन रोड, यषोदानगर, सावेडी रोड, अहमदनगर हा त्यांचा नात्याने भाचा आहे. तक्रारदार यांची पत्नी हिने त्यास व्यवसाय करण्यासाठी 61 लाख रूपये हातऊसने दिले होते.
तसेच तक्रारदार यांचे पत्नीने पुनीत कुमार रा. उत्तरप्रदेष याचेकडे व्यवसायानिमित्ताने 1 कोटी 25 लाख रूपये गंुतविले होते. त्यासंदर्भात करारनामा केलेला होता. परंतु पुनीत कुमार हा त्यांना पैसे परत देत नव्हता. त्यामुळे त्यांनी सदरचे पैसे काढुन देण्यासाठी त्यांचा भाचा मंगेष थोरात यास सदरचा करारनामा देवुन काही रक्कम दिली होती.
तक्रारदार सुभाश तुपे याची पत्नी सौ जयश्री तुपे यांनी आरोपी मंगेष थोरात यास दिलेल्या अॅग्रीमेटचा त्यांने गैरप्रकारे फायदा घेवुन व तक्रारदार यांची पत्नी हिने त्याचे सोबत केलेल्या संभाशणाचे रेकाॅर्डीगचा आधार घेवुन दिनांक 14/01/2024 ते दिनांक 22/01/2024 रोजी दरम्यान वेळोवेळी मोबाईलवर व्हाॅट्सअप काॅलवर संपर्क साधुन तक्रारदार व त्यांची पत्नी यांचे विरोधात अॅन्टी करप्षन ब्युरो मध्ये तक्रार करून कारवाई व बदनामी करण्याची तसेच जिवे ठार मारण्याची धमकी देवुन तक्रारदार यांची पत्नी हिने आरोपीत यास दिलेले हातऊसने पैसे परत मागु नये म्हणुन 1 कोटी रूपयांची खंडणीची मागणी केली होती.
त्यासंदर्भात त्यांचे संभाशणाचे रेकाॅर्डीग तक्रादार यांनी मोबाईलमध्ये केले होते.
त्यामुळे तक्रारादार यांनी खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे शहर येथे तक्रार दिल्याने आरोपी मंगेष अरूण थोरात यास सापळा रचुन दिनांक 14/02/2024 रोजी दुपारी 03.35 वाजता खारघर टोलनाका नवीमंुबई येथे 1 कोटी रूपये खंडणीची रक्कम स्विकारले नंतर ताब्यात घेण्यात आलेले आहे.
सदरबाबत तक्रारदार यांचे तक्रारीवरून नौपाडा पोलीस स्टेषन गु.र.न. 292/2024 भादवि कलम 384, 386, 387, 506(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन आरोपी नामे मंगेष अरूण थोरात यास अटक करण्यात आली आहे.
सदरची कारवाई मा. आषुतोश डंुबरे, पोलीस आयुक्त, ठाणे शहर, मा. डाॅ. ज्ञानेष्वर चव्हाण, पोलीस सह आयुक्त, ठाणे शहर. मा. डाॅ. पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त, (गुन्हे), ठाणे शहर मा. शिवराज पाटील, पोलीस उप आयुक्त, (गुन्हे), ठाणे, मा. राजकुमार डोंगरे, सहायक पोलीस आयुक्त, शोध -2, गुन्हे षाखा, ठाणे यांचे मार्गदर्षनाखाली शेखर बागडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खंडणी विरोधी पथक, ठाणे, मपोनि/वनिता पाटील, सपोनि/भुशण कापडनिस, सपोनि/सुनिल तारमळे, पोउपनि/विजयकुमार राठोड, सपोउनि/सुभाश तावडे, सपोउपनि/कल्याण ढोकणे, पोहवा/संजय राठोड, पोहवा/सचिन षिंपी, पोहवा/गणेष गुरसाळी, पोहवा/संदीप भोसले, पोहवा/ योगीराज कानडे, मपोहवा/षितल पावसकर, चापोना/भगवान हिवरे, पोशि/तानाजी पाटील, पोशि/अरविंद षेजवळ, मपोशि/मयुरी भोसले, सर्व नेमणूक खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा ठाणे शहर यांनी केली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com