सुरूर ता. वाई येथील माळावरची झोपडपट्टी येथे अनोळखी इसमाचा खून करुन अपघाताचा खोटा बनाव केलेला गुन्हा उघड करून४ आरोपी अटक..

उपसंपादक – रणजित मस्के
वाई :-दिनांक १९/०५/२०२४ रोजी सायंकाळी १५.४६ या. डायल ११२ घर मोबाईल नंघर १६८११५९४४१ चमन कॉल आला की, “सुरुर पुलाखाली अपघातात जखमी झालेला एक अनोळखी इसम पडला आहे अॅम्युलन्स व पोलीस पाठया” अशी माहिती मिळाल्याने भुईज पोलीस ठाणेकडील पोलीस अंमलदार यांनी तात्काळ सदर ठिकाणी जावून जखमीस १०८ अॅम्बुलन्स मधून सिव्हील हॉस्पिटल सातारा येथे उपचाराकरीता पाठवून दिले, त्यानंतर दिनांक २३/०५/२०२४ रोजी १८.१५ वा. सदरचा इसम सिव्हील हॉस्पीटल सातारा येथे उपचारा दरम्यान मयत झाल्यानं मुईज पोलीस स्टेशन अकस्मात मयत रजि. नंबर २२/२०२४ प्रमाणे मयत दाखल करणेत आले होते.
सदर अकस्मात मयतेच्या तपासामध्ये माळावरची झोपडपट्टी, सुरुर तसेच सुरुर गावातील १० ते १५ सीसीटीकी कॅमेरे पाहून त्यामध्ये संशयीत इसम हे दिनांक १९/०५/२०२४ रोजी सकाळी एका मोटर सायकल परुन दोघांचे मध्ये जखमीस बसवून घेवून जात असलेचे दिसून आले, त्यावरुन सदर मयताबाबत संशय निर्माण झालेने या अनुषंगाने तपास कैला असता गोपनीय माहिती मिळाली की, त्यामध्ये सदरचा इसम हा अपघातात जखमी झालेला नसून त्यास पारधी आरोपी नामे अक्कल रंगा काळे याने त्याचे घरातील ३ लोकांसह मयताचे त्याच्या दुस-या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन त्याचे डोक्यात दगड घालून जखमी केले होते व त्यानंतर त्यास सुरुर पुलाखाली आणुन टाकुन आरोपी नामे मक्शा रंगा काळे याने त्याचा मोबाईल नंबर १६८९९५९४४१ वरून डायल ११२ वर फोन करुन अपघाताचा खोटा बनाव केला होता.
सदर मयतेच्या तपासात भुईज पोलीस ठाणे गु.र.नं १८२/२०२४ भादविस कलम ३०२,५०४,५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आला होता.
सदरचा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने व आरोपी जक्कल रंगा काळे, मक्शा रंगा काळे हे सराईत गुन्हेगार असल्याने श्री. समीर शेख, भापोसे, पोलीस अधीक्षक सातारा, श्रीम. आंचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक सातारा, श्री.बाळासाहेब भालचिम, उपविभागीय पोलीस अधिकारी, पाई विभाग, श्री. अरुन देवकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांनी सदरच्या गुन्हयातील आरोपी यांना ताब्यात घेणेचाबत सुचना विल्या होत्या, त्याप्रमाणे सवर
गुन्हयातील आरोपी यांना पकडणेसाठी सपोनि रमेश गर्जे तसेच सपोनि रोहित फाणे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा सातारा व गुन्हे प्रकटीकरण शाखा, भुईज चे पथक तयार करण्यात आले होते.
सदर पथकाने आरोपीचे ठाव ठिकाण्याची माहिती काढून ३ पुरुष व १ महिला आरोपीस सुरुर परिसरातुन ताब्यात घेवून त्यांचेकडे विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केलेचे सांगितलेने त्यांना गुन्हयाचे तपासकामी अटक केले आहे.
मा.श्री.समीर शेख, भापोसे पोलीस अधीक्षक सातारा, मा.श्रीम. आंचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक सातारा, श्री.बाळासाहेब भालचीम, उपविभागीय पोलीस अधिकारी, वाई, श्री. अरुण देवकर, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि रमेश गर्जे, सपोनि रोहित फणे, पो.उप-नि. विशाल भंडारे, पोलीस अंमलदार वैभव टकले, आप्पा कोलवडकर, नितीन जाधव, शरद बेबले, प्रविण फडतरे, लक्ष्मण जगदणे, गणेश कापरे, संतोष संपकाळ, अमित माने, अविनाश चव्हाण, स्वप्निल कुंभार, अरुण पाटील, अमित संपकाळ, सोमनाथ बल्लाळ, रविराज वर्णेकर, सागर मोहिते, किरण निंबाळकर, ओंकार यादव, रोहित निकम, विशाल पवार, पृथ्वीराज जाधव, सचिन ससाणे, अमृत कर्पे, प्रविण पवार, शिवाजी गुरव, म.पो.कॉ. भाग्यश्री जाधव, रुपाली शिंदे यांनी या कार घेतला आहे.
आरोपी जक्कल रंगा काळे याचेचर २८ गंभीर गुन्हे दाखल असुन अटटल गुन्हेगारांकडुन खुना गुन्हा उघड केल्याबददल सदर कारवाईमध्ये सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे मा. पोलीस अधीक मा.अपर पोलीस अधीक्षक सातारा तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, वाई यांनी अभिनंदन केले आहे.आरोर्षीची नावे –



१) जक्कल रंगा काळे वय ४५ वर्ष (स्वतः)
२) मक्शा रंगा काळे वय ४० वर्ष (भाऊ)
३) सोनु जक्कल काळे वय १९ वर्ष (मुलगा)
४) संगीता जक्कल काळे वय ४२ वर्ष (पहिली पत्नी सर्व रा. सुरुर ता. वाई जि. सातारा
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com