मलवडी जंगलातील खुनाचा अवघ्या ३ तासात उलगडा करुन आरोपी फलटण ग्रामीण पोलीसांकडून जेरबंद !

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

सातारा :-मलवडी, ता. फलटण गावचे हदीतील रहिवाशी असलेल्या अनिल नामदेव चव्हाण वय हे नेहमीप्रमाणे प्रातः विधीसाठी मलवडी गावचे हदीतील फॉरेस्ट नावच्या शिवारात गेले असता कोणीतरी अज्ञात इसमांनी धारदार शस्त्राने त्यांचे डोक्यात वार करून त्यांचा जागीच खुन केल्याची माहिती दि. १९/१०/२०२३ रोजी सकाळी ०८.०० वा. चे सुमारास फलटण ग्रामीण पोलीस ठाणेचे पोलीसांना प्राप्त ४२ वर्ष होताच त्यांनी लागलीच घटनास्थळी भेट दिली असता अनिल नामदेव चव्हाण यांचा मृतदेह निर्जनस्थळी रक्ताचे थारोळ्यात पडलेला दिसुन आला. त्यामुळे मयत अनिल नामदेव चव्हाण याचे पत्नीच्या तक्रारीवरुन फलटण ग्रामीण पोलीस ठाणे. गु. र. नं. १५८१/२०२३ भा. दं. सं. कलम ३०२, ३४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

फलटण ग्रामीण पोलीस ठाणेकडील पोलीस है गोपनीय माहिती व परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना मयत अनिल नामदेव चव्हाण याचा खुन हा महिलांबाबतच्या त्याच्या गैरवर्तणुकीच्या कारणावरुन झाल्याची माहिती प्राप्त झाली होती. परंतु त्याचा सख्खा मावसभाऊ असलेला आरोपी पोपट खाशाबा मदने हा “तो मी नव्हेच” या आविर्भावात गुन्ह्याचे घटनास्थळावरील बघ्याचे गर्दीमध्ये वावरत होता व पोलीसांच्या हालचालींवर लक्ष ठेवून होता. परंतु पोलीसांनी बघ्यांच्या गर्दीमधुन आरोपी पोपट खाशाबा मदने याच्या हालचाली व देहबोली चाणाक्षपणे हेरुन त्यास संशयाच्या आधारे चौकशीकामी ताब्यात घेतल्यानंतर त्याने सुरुवातीला ३ तास उडवाउडवीची उत्तरे देऊन दिशाभुल करणारी माहिती सांगत होता. परंतु पोलीसांनी प्राप्त परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे त्याचेवर कौशल्यपूर्णरीतीने विविध प्रश्नांची सरबत्ती करीत त्यास पोलीस खाक्या दाखविताच त्याने त्याच्या अल्पवयीन मुलाच्या मदतीने अनिल नामदेव चव्हाण याचा खुन केल्याची कबुली दिली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री सुनिल महाडीक हे करीत आहेत.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक मा. समीर शेख सी, अपर पोलीस अधीक्षक मा. आँचल दलाल मॅडम व उपविभागीय पोलीस अधिकारी मा. राहुल घस सो यांच्या मार्गदर्शन व सुचनांनुसार फलटण ग्रामीण पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक सुनिल महाडीक यांचे नेतृत्वाखाली स. पो. नि. नवनाथ रानगट, स. पो. नि. अशोक हुलगे, पो. उ. नि. सागर अरगडे, पो. उ. नि. प्रमोद दीक्षत, पो. उ. नि. पाटील, पोलीस अमलदार संजय अडसुळ, गार्डी, वैभव सूर्यवंशी, नितीन चतुरे, अमोल जगदाळे, श्रीनाथ कदम, अमोल पवार, विक्रांत बनकर, हनुमंत दडस, श्रीकांत खरात, विक्रम कुंभार, तुषार नलवडे या पोलीस अधिकारी व अमलदारांनी केलेली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट