सोशल मिडीयाव्दारे खोटी बातमी प्रसिध्दी करणा-या इसमावर गुन्हा दाखल..

उपसंपादक-रणजित मस्के
सांगली :-पोलीस स्टेशन विश्रामबाग
अपराध क्र आणि कलम
अदखलपात्र, गु.र.नं. ६२६/२०२४. भारतीय न्याय संहिता कलम १७५
फिर्यादी नाव
शेखर वसंत जोशी, वय ५२ वर्षे, पत्ता – विश्रामबाग, सांगली
गु.घ.ता वेळ व ठिकाण दिनांक १८.११.२०२४ रोजी १२.०० या. चे सुमारास
गु.दा.ता वेळ दिनांक १८.११.२०२४
आरोपीचे नाव व पत्ता लहू गडदे नावाचा व्यक्ती
गुन्हयाची थोडक्यात हकीकत-
दिनांक १८.११.२०२४ रोजी दुपारी ११.१९ वा. चे सुमारास नावाच्या व्हॉटसअॅप ग्रुपवर लहू गडदे नावाच्या व्यक्तीने त्याचा मोबाईल नंबर साप्ताहिक आपली बातमी वरुन, सकाळ वृत्तपत्राचे मास्टर हेड वापरुन तेथे सांगली, शनिवार, १६ नोव्हेंबर २०२४ असे लिहून पहिल्या पानावर ठळक अक्षरात ” जत विधानसभा प्रचाराच्या अंतिम टप्यात गोपीचंद पडळकर पिछाडीवर” असे व त्याखाली लहान अक्षरात भाजपच्या अंतर्गत गटबाजीचा फटका” असा मजकुर लिहुन त्याखाली त्या संदर्भातील बातमी तयार करुन दिनांक ११.१९ वाजता सदर व्हॉटसअॅप ग्रुपवर प्रसारित करून सोशल मिडीयावर निवडणुकीत गैरवाजवी प्रभाव पाडण्याचे उद्देशाने खोटी बातमी प्रसारीत केली आहे म्हणून विश्रमबाग, पोलीस ठाणे येथे सकाळ वृत्तपत्राचे सहयोगी संपादक शेखर जोशी यांनी वरील प्रमाणे गुन्हा नोंद केला असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास विश्रामबाग पोलीस ठाणे हे करीत आहेत.

सध्या महाराष्ट्रात विधानसभा २०२४, ची निवडणुक प्रक्रिया सुरु असुन त्या अनुषंगाने कोणीही सोशल मिडीयावर अशा प्रकारे अनधिकृत प्रसिध्द होणा-या खोट्या बातम्या व व्हिडीओ यांचेवर विश्वास ठेवु नये. तसेच व्हॉटसअॅप, इन्स्टाग्राम, फेसबुक वापरकर्ते व ग्रुप अॅडमीन यांनी अशा प्रकारे चुकीच्या अगर अनधिकृत बातम्या ते वापरत असलेले सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर प्रसिध्द होणार नाहीत याची पुर्णपणे दक्षता व काळजी घ्यावी, अन्यथा ते प्रसारित करणारे इसम व ग्रुप अॅडमीन यांचेवर प्रचलित कायद्यानुसार गुन्हा नोंद
करुन कारवाई करण्यात येईल याची सर्व नागरीकांनी व सोशय मिडीया युजर्स यांनी नोंद घ्यावी. तसेच अशा प्रकारे खोडसाळ व निवडणुकीवर गैरवाजवी प्रभाव पाडणा-या बातम्यांचे अनुषंगाने नागरीकांची काही तक्रार असल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस ठाणेशी संपर्क साधावा व अशा चुकीच्या बातम्या, पोस्ट या आपलेकडुन फॉरवर्ड होणार नाहीत याची दक्षत घ्यावी असे आवाहन संदीप घुगे, पोलीस
अधीक्षक, सांगली यांनी केले आहे.
अशा मुद्दाम व खोडसाळपणे बातम्या प्रसिध्द करणारे इसमांवर सांगली पोलीस व सायबर विभाग, सांगली हे लक्ष ठेवुन आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com