‘थर्टी फर्स्ट’च्या पार्श्वभूमीवर पोलिसांची मोठी कारवाई15 लाख रूपयांपेक्षाही जास्तचा दारूसाठा जप्त…

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

वर्धा :– नवीन वर्षाच्या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठ्या प्रमाणात गोदामात साठवून ठेवलेला दारूसाठा पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई 31 रोजी शहरातील बुरड येथे करण्यात आली. याप्रकरणी शहरारूख बेद याच्याविरुद्ध दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गोदामातून विविध देशी- विदेशी ब्रँडचा 15 लाखांपेक्षा जास्त दारूसाठा जप्त करण्यात आला आहे. ‘थर्टी फस्ट’च्या अनुषंगाने पोलिसांनी जिल्ह्यात चोख बंदोबस्त लावण्यात आला. गस्तीवर पोलिस पथक तैनात करण्यात आले. अशात 31 डिसेंबरसाठी मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी साठवून ठेवलेल्या दारूच्या गोदामात छापा मारीत 15 लाखांपेक्षा जास्तचा माल जप्त करण्यात आला.

माहितीनुसार आरोपीने काही महिन्यांपूर्वी बुरड मोहल्ला येथे नरेश छापेकर यांचे घर भाड्याने घेतले होते. थर्टी फस्ट तसेच नवीन वर्षाच्या स्वागताला दारूची वाढती मागणी लक्षात घेता मोठ्या प्रमाणात दारूसाठा जमा करून ठेवला होता. याची माहिती पोलिसांना मिळताच गोदामावर छापा मारला. घराचे दार उघडताच चार खोल्यांत विविध कंपनीच्या विदेशी दारूच्या बॅन्डने शिलबंद बॉटलांचे बॉक्स आढळून आले. सोबत खोलीत असलेल्या ‘डीप फ्रिजर’मधील एका फ्रीजमध्ये बीयरच्या बॉटला आढळून आल्या. जवळपास चार खोल्यांमध्ये आढळून आलेल्या दारूची किमत 15 लाखांपेक्षा जास्त असल्याचे सांगण्यात आले आहे.

ही कारवाई शहर पोलिस ठाण्याचे ठाणेदार धनाजी जलक, एपीआय संदीप कापडे, एपीआय संदीप गाडे, पीएसआय गजानन गजानन जाचक, एएसआय नरेश पेटकर यांच्यासह पोलिस अधीक्षक यांच्या सीआययू दल, शहर ठाण्याचे डीबी पथकाने संयुक्तरित्या केली.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट