माजी नगरसेवक लोकेश ऊर्फ कल्लु यादव यांचेवरील गोळीबार प्रकरणी14 महिन्यापासून फरार असलेल्या मुख्य सूत्रधार आरोपी अखेर गोंदिया पोलीसांचे जाळ्यात

सह संपादक- रणजित मस्के
गोंदिया ;
प्रशांत उत्तम मेश्राम वय 38 वर्षे रा. भीमनगर गोंदिया असे अटक करण्यात आलेल्या मुख्य सूत्रधार आरोपीचे नाव आहे.
मा. पोलीस अधीक्षक गोंदिया यांचे निर्देश सूचनान्वये उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग गोंदिया, स्थानिक गुन्हे शाखा, व पोलीस ठाणे गोंदिया शहर पोलीसांची संयुक्त कारवाई ➖.
—-▪️▪️▪️—-
⏩. याबाबत सविस्तर माहिती अशी की, दिनांक 11 जानेवारी 2024 रोजी चे साधारण 11.00 वा . ते 11.30 वा. दरम्यान सावलानी किराना दुकानाचे समोर हेमु कॉलोनी, यादव चौक गोंदिया येथे दोन अज्ञात आरोपीतांनी “माजी नगरसेवक जखमी नामे- लोकेश ऊर्फ कल्लु सुंदरलाल यादव वय 42 वर्ष रा. यादव चौक गोंदिया यांचेवर बंदुकीने गोळी मारुन गंभीर जखमी करुन जिवानिशी ठार करण्याचा प्रयत्न केल्याने फिर्यादी लक्की छगनलाल यादव वय 20 वर्ष रा. बाराखोली सिंधी कॉलोनी गोंदिया याचे रिपोर्ट वरून पो. स्टे. गोंदिया शहर अप.क्र. 11/2024 कलम 307, 34 भादवि. सह कलम 3, 25 भा.ह. का. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता…… सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपी हे गोळीबाराची घटना करून पसार झाले होते…
🕹️ सदर घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक गोंदिया, अप्पर पोलीस अधीक्षक, गोंदिया उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग गोंदिया यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस पथकांनी आरोपीतांचा शोध घेऊन नमुद गुन्ह्यात यापूर्वी 9 आरोपींना अटक करण्यात आलेली असून…. सदर गुन्ह्याचे तपास दरम्यान आरोपी यांनी गुन्हयात वापरलेली 01 नग पिस्टल व 03 नग जिवंत काडतुस व गुन्हयात वापरलेल्या 2 मोटार सायकल, 4 नग मोबाईल हस्तगत करुन गुन्ह्यात या अगोदरच जप्त करण्यात आले आहे…….. सदर गुन्ह्याचे तपासअंती यापूर्वी अटक करण्यात आलेल्या आरोपींविरुद्ध मा. न्यायालयात दोषारोप दाखल करण्यात आले आहे.
🕹️ गुन्ह्याचे तपास दरम्यान अटक आरोपींनी सांगितलेल्या माहिती नुसार गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार हा प्रशांत मेश्राम असल्याचे निष्पन्न झाल्याने व तो गुन्हा केल्यापासून फरार झाल्याने त्याला जेरबंद करण्याकरीता वरिष्ठांचे निर्देश मार्गदर्शनात गोंदिया शहर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी, अंमलदार यांची वेगवेगळी पथके नेमण्यात आली होती व नेमलेल्या विविध पथकाद्वारे त्याचा कसोशीने जिल्हयात व ईतर राज्यात शोध घेण्यात येत होता… अखेर 14 महिन्यानंतर दिनांक- 03/03/2025 रोजी 20.00 ते 21.00 वाजता दरम्यान मिळालेल्या गुप्त खात्रीलायक माहिती वरून आरोपीस त्याचे राहते घरून भीमनगर येथून ताब्यात घेऊन जेरबंद करण्यात आले आहे…….पो. स्टे. गोंदिया शहर येथील नमूद गुन्ह्यामध्ये आरोपीस अटक करण्यात आलेली असून दिनांक 04/03/2025 रोजी मा. न्यायालय गोंदिया यांचे समक्ष आरोपीस हजर केले असता गुन्ह्याचे तपास संबंधाने आरोपीची आवश्यकता असल्याने पोलीसांचे विनंती वरून मा. न्यायालयाने आरोपीचा दिनांक 07/03/2025 पर्यंत पोलीस कोठडी मंजुर केला आहे…
📍गुन्ह्यात सहभागी व यापूर्वी अटक करण्यात आलेल्या 9 आरोपीतांना केलेल्या विचारपुस, चौकशी, तपासावरुन आरोपी व जखमी यांचेत आपसात जुन्या देवाण घेवाणच्या निर्माण झालेल्या वैमनस्य -वितुस्ठ कारणावरून सदरचा जीवघेणा गोळीबार झाल्याचे तपासात निष्पन्न झाले होते….आता गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार आरोपी क्र. 10) प्रशांत मेश्राम यास जेरबंद करून अटक करण्यात आल्याने गुन्ह्याचे पुढील सखोल तपासात गुन्ह्याचा उलगडा बाबत सविस्तर माहिती निष्पन्न होवू शकते….
सदर गुन्ह्याचा तपास मा. वरिष्ठांचे मार्गदर्शनात स.पो.नि. गेडाम पो. स्टे. गोंदिया शहर हे करीत आहेत…