मैत्री कशी जपावी हे आदर्श न्यू इंग्लिश स्कूल बामणोली दहावी 2001 ग्रुपच्या विद्यार्थी मित्राकडून शिकावे…

प्रतिनिधी :-सचिन पवार
माणगांव रायगड
माणगांव :-2001 साली दहावीच्या विखरूलेल्या ग्रुपच्या मित्र मैत्रीणींना ग्रुपचे ऍडमिन निलेश भागोजी पवार यांनी व्हॉट्सअँप च्या माध्यमातून एकत्र आणले. आणि यानंतर सुरु झाले गेट टू गेदर आणि जुनी आठवणी सर्व मित्र मैत्रीणींना एकत्र आणून व्हॉटसं अँप वर चर्चा करून कुठे तरी ट्रिप काढून पुन्हा एकदा भेटू या अशी चर्चा होतात सर्व मित्र आनंदित झाले होते.

मैत्री कशी जपावी हे आदर्श न्यू इंग्लिश स्कूल बामणोली दहावी 2001 चे विद्यार्थी मित्राकडून शिकावे. यातुन पाहायला मिळाले ग्रुप ऍडमिन निलेश पवार रा. बामणोली यांनी आपल्या वर्गात शिकणारे आपले मित्र मैत्रीण यांना माणगांव तालुक्यातील मौजे मुगवली स्वयंभू गणपती मंदिर येथे बोलावून गेट टू गेदर केले यावेळी एकूण दहावी मध्ये ५० चा पट्ट शिक्षण घेत होता. सर्व मित्रांना जवळ बोलावून एक आनंदाचा वातावरण निर्माण झाल आणि जुन्या आठवणीत मित्र मैत्रिणी हरवून गेले एका एका बेचवर बसणारे आपण आपल्याला शिकवणारे ते शिक्षक आपण सहलीसाठी कोणत्या कोणत्या ठिकाणी गेलो त्या आठवणी, एकादी स्पर्धा त्याच्यात कब्बड्डी, खो खो, लगडी, उंच उडी लांब उडी, भाला फेक, गोळा फेक असे अनेक प्रकार आपण खेलो, असे अनेक प्रकारांची गप्पा गोष्टी यांच्यातच बोलण्यात दंग झालेले दहावीचा ग्रुप.
2001 च्या विखूरलेल्या दहावी च्या मित्र मैत्रिणीला जवळ आणणाऱ्या निलेश पवार चे कौतुक मित्र मैत्रिणीकडून करण्यात आले या गेट टू गेदर ला मुकुद वाढवलं, महादेव पवार, दिपक भोस्तेकर, सचिन पवार, सचिन साळवी,दिनेश देवरे, महादेव पाखुर्डे, प्रकाश गुगळे, ज्ञानेश्वर गुगळे, प्रमिला वाढवलं, अरुणा गुगळे, दर्शना शेलार, सचिन पवार आदी मित्राने या गेट टू गेदर मध्ये सहभाग घेतला होता.त्याच्यात दिनेश देवरे, दर्शना शेलार व सचिन पवार यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले तसेच ग्रुप ऍडमिन निलेश पवार यांचे जास्तीत जास्त आभार मानले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com