महिलेची छेडछाड करुन विनयभंग करणा-या आरोपीस २९ दिवसांचेआत शिक्षा..!

0
Spread the love

सफाळा

उपसंपादक-मंगेश उईके

दिनांक ३०/०३/२०२५ रोजी रात्री ०८.३० वाजताचे सुमारास पिडीत फिर्यादी हया धोंदलपाडा, केळवे रोड पूर्व येथे टिकलीला स्टोन लावण्याचा कच्चा माल घेवून रोडने पायी एकटीचं चालत येत असतांना आरोपी ओमकार संतोष जाधव, रा. पिलाजीनगर, केळवे रोड पूर्व हा मुलगा पिडीत फिर्यादीचे समोरुन फिर्यादीचे जवळ चालत आल्याने फिर्यादी ही त्यांचे बाजूने रस्ता करुन जावू लागली असता आरोपीने फिर्यादीचे हाताला पकडून तोंड दाबून मानेला पकडले. त्यावेळी फिर्यादीने त्यास जोरात झटका देवून स्वतः ला सोडवून घेवून पळण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने पिडीत फिर्यादीची साडी पाटीमागून पकडून फिर्यादीचे मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करुन विनयभंग केला आहे. त्याबाबत पिडीत फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीवरुन सफाळा पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ४०/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ७४ अन्वये दिनांक ३१/०३/२०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवून सपोनि / दत्ता शेळके, प्रभारी अधिकारी, सफाळा पोलीस ठाणे यांनी श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर यांना माहिती दिली असता त्यांनी सदर गुन्हयात सबळ पुरावे प्राप्त करुन तात्काळ आरोपीविरुध्द मा. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करावे असे आदेश केल्याने सपोनि/दत्ता शेळके, प्रभारी अधिकारी, सफाळा पोलीस ठाणे यांनी सदर गुन्हयातील तपासिक अंमलदार पोना/६० बी. के. भावर यांना तपासाबाबत मार्गदर्शन करुन गुन्हयात पुरावे गोळा करुन २४ तासांचे आत दिनांक ०१/०४/२०२५ रोजी मा. प्रथमवर्ग न्यायंदडाधिकारी साो पालघर येथे दोषारोपपत्र दाखल केले असता मा. न्यायाधीश श्री. के.जी. सावंत, प्रथमवर्ग न्यायंदडाधिकारी पालघर व सरकारी वकील श्रीमती आशा मारवाडी, कोर्ट पैरवी सपोउनि/व्ही.पी. भोये, नेमणूक सफाळा पोलीस ठाणे यांनी २९ दिवसांचे आत सदर गुन्हयातील पिडीत फिर्यादी, साक्षीदार, पंच यांना पडताळणी करुन दिनांक २९/०४/२०२५ रोजी आरोपीतास ०१ वर्ष कारावास व ५०००/- रुपये दंड ही शिक्षा ठोठावलेली आहे.

सदरची कामगिरी ही श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. विनायक नरळे, अपर पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. अभिजीत धाराशिवकर, उप विभागीय पोलीस अधिकारी, पालघर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि/दत्ता शेळके, प्रभारी अधिकारी, सफाळा पोलीस ठाणे, सपोउनि/व्ही. पी. भोये (कोर्ट पैरवी), सपोउनि / महेंद्र शर्मा, पोहवा/८२० के. बी. शेळके, पोना/६० बी.के.भावर, मपोना/१०४३ एन.टी.गावित, पोअं/१२१८ ए. बी. मोघे यांनी पार पाडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट