महीलांशी मोबाईल फोनवर संपर्क साधून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन व फसवणूक करणाया

0
Spread the love

महीलांशी मोबाईल फोनवर संपर्क साधून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन व फसवणूक करणाया आरोपींचा दिल्ली येथे शोध घेउन अटक शिवाजीनगर पोलीस ठाणेच्या पो.उ.नि मनीषा जाधव व पोलीस पथक यांची दिल्ली येथे कारवाई…

प्रतिष्ठीत महिलांच्या फोनवर संपर्क साधून पैसे मिळविण्यासाठी गैरकृत्य करण्याचे आमीष दाखवून मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करणाऱ्या अज्ञात आरोपीविरुद शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे गुनो. १९८/२२ भादवि कलम ५०९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासामध्ये यातील अज्ञात आरोपी हा अनेक व्यक्तीना कॉल करून त्याना विविध प्रलोभने दाखवून पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडत असल्याचे त्यावरून यातील अशात आरोपीचे बैंक डिटेल्स प्राप्त केले असता बँकेचा पत्ता जनकपुरी, दिल्ली व मोबाईल फोनचे टॉवर लोकेशन देखील त्याग परीसरात येत असल्याचे आढळले.

वरीष्ठांच्या परवानगीने पोउनि मनीषा जाधव, पो.हा रूपेश पारे व पो. शि. आदेश लवादी यांनी उपासकामी दिल्ली येथे पाठविले. सदर पथकाने जनकपुरी पश्चिम व पूर्व, विकासनगर, पालम विहार कॉलनी, गाझीयाबाद (उत्तरप्रदेश), हरीनगर या परीसरात सतत १३ दिवस अथक परीश्रम करून २५० सीसीटीव्हीचे फुटेज चेक करून आरोपीचे टॉवर लोकेशन, आरोपीचा वावर असलेली ठिकाणे, आरोपी वापरत असलेली बैंक अकाउंट इत्यादी बाबत माहिती संकलीत केली व आरोपी वापरत असलेल्या दुचाकीचा मेक व नंबर निपन्न करून आर.टी.ओ. कडून दुचाकी मालकाची माहीती प्राप्त केली. त्यानंतर स्थानीक बातमीदार तयार करून त्यांना विश्वासात घेउन यातील आरोपीचा दावठिकाणा शोभून काढला व सापळा रचून आरोपी नामे १) चैवन मासी दासी, वय ३२, रा. विरेद्रनगर, दिल्ली व २) कविता अनिल शर्मा, वय २२, रा. उत्तमनगर, दिल्ली याना ताप्यात घेऊन अटक करण्यात आली. त्यांच्याकडे केलल्या तपासामध्ये त्यांनी गुन्हा कबूल केला असून गुन्हयात वापरलेल्या मोबाईल फोनसह एकुण आठ मोबाईल फोन व सिमकार्ड जप्त करण्यात आले.

WhatsApp Image 2023-05-03 at 1.18.44 PM
WhatsApp Image 2023-05-03 at 1.18.45 PM

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट