महाड तालुक्यातील कुसगाव खरबाचा कोंड येथे महिलेचा विनयभंग…

0
Spread the love

उपसंपादक-राकेश देशमुख

महाड :-महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात पती-पत्नी विरोधात गुन्हा दाखल

महाड तालुक्यातील कुसगाव खरबाचा कोंड येथे एका 35 वर्षीय महिलेचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे. याबाबत पती-पत्नी विरोधात महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरती अतिश गुडेकर व अतिश गुडेकर अशी पती-पत्नी आरोपींची नावे आहेत.दिनांक 29 जून 2024 रोजी आरोपी आरती गुडेकर या त्यांच्या अंगणात कपडे धुवत असताना त्यांचे खराब पाणी फिर्यादी यांच्या अंगणात आल्याने फिर्यादी या आरोपींना विचारण्यास गेले असता आरोपी यांना राग अनावर झाला व आरोपी नवरा-बायको यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ केली तसेच आरोपी अतिश गुडेकर यांनी फिर्यादी यांचा हात पकडून त्यांचा गाऊन ओढला, व त्यांच्या मनामध्ये लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.

त्यानंतर आरोपी अतिश गुडेकर याने फिर्यादी यांना अंगणातून फरपटत घेऊन कानाखाली मारली व अश्लील भाषेत शिवीगाळ केली.

याप्रकरणी महाड एमआयडीसी पोलीस ठाणे येथे दोघा पती-पत्नी विरोधात भादवीस कलम 354, 509, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार नीलिमा सागर गायकवाड या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट