महात्मा गांधी चौक पोलीसानी नशेच्या गोळ्यांची वाहतूक करुन चढ्या दराने विक्री करणा-यांवर छापा, एका अल्पवयीन सह ३ इसमांवर गुन्हा दाखल..

0
Spread the love

सह संपादक -रणजित मस्के

सांगली

९२८ नशेच्या गोळ्यांसह एकूण १,७२,८००/- रु. चा मुद्देमाल जप्त

पोलीस स्टेशन

महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरज, जि. सांगली

अपराध क्र आणि कलम

गु.र.नं. १६४/२०२५ एनडीपीएस अॅक्ट १९८५ चे कलम ८ (क), २२ (अ) सह औषधी व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० चे कलम १८(c)

गुन्हा दाखल तारीख

मुन्हा घडला वेळ व ठिकाण

दि. ०८,०७,२०२५ रोजी १६.०५ वा. गांधी चौक, मिरज ते एम.आय.डी.सी. कुपवाड रोडवरील हॉटेल पूर्या जवळ, मिरज

दि. ०८.०७.२०२५ रोजी

फिर्यादी नाव

नानासाहेब लक्ष्मण चंदनशिवे, पोलीस नाईक/२१४०, नेम, महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरज

माहितीचा स्वोत

गोपनीय बातमीदारामार्फत संदीप शिंदे, सहा. पोलीस निरीक्षक

कारवाई करणारे पोलीस अधिकारी आणि अंमलदार

मा. श्री. संदीप पुगे, पोलीस अधिक्षक, सांगली मा. श्रीमती कल्पना बारवकर, अपर पोलीस अधिक्षक, सांगली मा. श्री. प्रणिल गिल्डा, उपविभागीय पोलीस अधिकारी, मिरज विभाग श्री. संदीप शिंदे, सहा. पोलीस निरीक्षक, प्रभारी महात्मा गांधी चीक पोलीस ठाणे, मिरज यांचे मार्गदर्शानाखाली
पोलीस उपनिरीक्षक श्रीमती पूनम पाटील, श्रीमती रुपाली गायकवाड, श्री विनोद शिंदे, पोलीस हेडकॉन्स्टेबल सचिन कुंभार, अभिजीत धनगर, अभिजीत पाटील, सर्जेराव पवार, पोलीस नाईक नानासाहेघ चंदनशिवे, पोलीस कॉन्स्टेपल राजेंद्र हारगे, विनोद चव्हाण, अमोल तोडकर, घसवराज कुंदगोळ चालक सहा. पोलीस उपनिरीक्षक सुनिल कांचळे, चालक पोलीस नाईक देवानंद नागरगोजे

संशयित नाच व पत्ता

१) आरबाज ऊर्फ इब्राहीम रेठरेकर, वय २१ वर्षे, रा. अमननगर, सुभाषनगर रोड, मिरज

२) अब्दुलरझाक अब्दुलरहीमान शेख, वय २० वर्षे, रा. मालगाव रोड, आलीशान कॉलनी, मिरज

३) उमरफराज राजू शेख, वय ३२ वर्षे, रा. शनिवार पेठ, बागवान गल्ली, मिरज ४) एक अल्पवयीन बालक

जप्त मुद्देमाल

Nitrosun 10 नावाच्या ९२८ नशेच्या गोळ्यांसह एकूण १,७२,८००/- रु. किंमतीचा मुद्देमाल

जप्त केला आहे.

मुन्ह्याची थोडक्यात हकीकत :-

मा. भारत सरकार यांच्या नशामुक्त भारत अभियान” चे पार्श्वभूमीवर सांगली जिल्हयातील नशेच्या पदार्थाच्या वितरण च विक्री तसेच नशाखोरीचर अंकुश ठेवून नशेचे पदार्थ विक्री तसेच वितरण करणारे संशयित इसमांचे विरोधात प्रभावी व सातत्यपूर्ण कारवाईसाठी श्री. संदीप घुगे, मा. पोलीस अधिक्षक सांगली, मा. श्रीमती कल्पना बारवकर, अपर पोलीस अधिक्षक, सांगली व श्री. प्रणिल गिल्डा, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, मिरज विभाग यांनी विशेष सूचना देवून गांजा व गुटखा तसेच नशेच्या साहीत्याची चिक्री करणारे लोकांवर प्रभावी कारवाई करुन गुन्हेदाखल करण्याबाचत आदेश दिले आहेत.

सदर आदेशाप्रमाणे संदीप शिंदे, सहा. पोलीस निरीक्षक, प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरज यांनी तात्काळ कारवाई करीत नशेच्या पदार्थांचा साठा, विक्री व वितरण करणारे इसमांचाधत माहीती उपलब्ध करुन त्यांचेवर प्रभावी कारवाई करण्यासाठी पोलीस ठाणेकडील डि.बी. पथकाकडील अधिकारी व अंमलदार यांना सुचित केले होते. त्यानुसार महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील डी. बी. पथकाने वेळोवेळी कारवाई करीत नशाखोरी प अंमलीपदार्थ तसेच गुटखा विक्री रोखण्याचे अनुषंगाने पोलीस ठाणे हद्दीत प्रभावीपणे छापा कारवाई करुन उत्कृष्ठ कामगिरी केली आहे.

मा. वरीष्ठांचे आदेशाप्रमाणे नशाखोरी तसेच अंमली व नशायुक्त पदार्थ तसेच गुठ्खा विक्री रोखण्याचे अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे कडील नमूद पोलीस पथक पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना श्री. संदीप शिंदे, सहा. पोलीस निरीक्षक, प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरज यांना दि. ०८.०७.२०२५ रोजी गोपनीय माहीती मिळाली की, इसम नामे आरवाज रेटेरकर, रा. अमननगर, मिरज हा त्याचे काही साथीदारांसह अवैधरीत्या नशा करण्यासाठी वापरण्यात येणा-या गोळ्ळ्यांची विक्री करण्याकरीता गांधी चौक, मिरज ते एम.आय.डी.सी. कुपवाड रोडवरील हॉटेल सन्मानजयळ येणार असल्याची खात्रीलायक बातमी मिळाली, सदर चातमीवरुन संदीप शिंदे, सहा. पोलीस निरीक्षक, प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरज यांनी तात्काळ महत्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील पोलीस उपनिरीक्षक पूनम पाटील व नमूद पोलीस पथक यांना रवाना करुन सदर इसमांवर छापा टाकून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले, त्यानुसार महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील पोलीस उपनिरीक्षक पूनम पाटील यांचे नेतृत्वाखाली नमूद पोलीस पथक हे पंच व फोटोग्राफर तसेच श्रीमती जयश्री सयदत्ती, सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, सांगली यांचेसह मिळाले बातमीप्रमाणे बांधी चौक, मिरज ते एम.आय.डी.सी. कुपवाड रोडवरील हॉटेल सन्मानजवळ येथे जावून तेथे सापळा रचून वाँच करीत थांबले असता दोन इसम चालत तसेच त्यांचे मागे दोन इसम एका मोपेड दुचाकीचरुन तेथे जवळच असणा-या हॉटेल पूर्वा जवळ येवून थांबले, त्यांचा मिळाले बातमीप्रमाणे संशय आल्याने नमूद पोलीस पथकाने त्यांना पळून जाणेची संधी न देता शिताफीने ताब्यात घेवून त्यांचेयर कायदेशीर कारवाई करीत संशयित इसम नामे १) आरबाज ऊर्फ इब्राहीम रेठरेकर, वय २१ वर्षे, रा. अमननगर, सुभाषनगर रोड, मिरज, २) अब्दुलरझाक अब्दुलरहीमान शेख, यय २० वर्षे, रा. मालगाव रोड, आलीशान कॉलनी, मिरज, ३) उमरफराज राजू शेख, वय ३२ वर्षे, रा. शनिवार पेठ, बागवान गल्ली, मिरज च ४) एक अल्पवयीन बालक यांचेकडून अवैचरित्या नशा करण्यासाठी वापरण्यात येणारे Nitrosun 10 नावाच्या ९२८ नशेच्या गोळ्यांसह गांजा या अंमली पदार्थान भरलेल्या ३ चिलीम व गुन्हा करण्यासाठी वापरलेली मोपेड मोटारसायकल असा एकूण १,७२,८००/- रु. किमतीचा अवैधरित्या नशा करण्यासाठी वापरण्यात येणा-या नशेच्या गोळ्यांचा साठा जप्त केला असून त्यांचेकडे कौशल्यापूर्ण तपास केला असता, ते सदरच्या अवैधरीत्या नशा करण्यासाठी वापरण्यात येणा-या गोळ्या या मिरज परीसरात चढ्या दराने किरकोळ स्वरुपात विक्री करुन वितरीत करीत असल्याचे निष्पन्न झाले असून यातील आरोपी क्र. ३) उमरफराज राजु शेख, चय ३२ वर्षे, रा. शनिवार पेठ, बागवान गल्ली, मिरज याचे औषध विक्रीचे मेडीकल दुकान असत्याची प्रार्थामक माहीती प्राप्त झालेली आहे. त्याअनुषंगाने सदर गुन्हयाचा पुढील तपात्त मा. वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरज कडील पोलीस उपनिरीक्षक पूनम पाटील हे करीत आहेत.

महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडून ” नशामुक्त भारत अभियान” पार्श्वभूमीवर नशायुक्त पदार्थ व गुटखा विक्री तसेच वितरण करणा-या व्यवस्थेची पाळेमुळे खणून काढणेच्या अनुषंगाने नशाखोरी विरोधी कारवाईत सातत्य राख्ात यापूर्वी नशेचे इंजेक्शन, गांजा कारवाई, महाराष्ट्र शासनाने प्रतिचंधीत केलेल्या सुगंधी तंबाखू च गुटखा यांचेवर जास्तीत जास्त प्रभावी कायदेशीर कारवाई करुन आता अवैधरित्या नशा करण्यासाठी वापरण्यात येणा-या नशेच्या गोळ्या या प्रकारात देखील प्रभावी कारवाई करुन नशेखोरीच्या अवैध व्यवसायाचा समृळ श्रीमोड करण्याच्या उपाययोजना राचविण्यात येत असून नागरीकांनी नशायुक्त पदार्थाधाश्त माहीती पोलीस प्रशासनास देण्याचे महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेतर्फे आवाहन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट