महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या अंमली पदार्थ विरोधी कारवाईचे ज्येष्ठ सिनेअभिनेते व वृक्षप्रेमी श्री. सयाजी शिंदे यांचेकडून कौतुक

सह संपादक -रणजित मस्के
मिरज




जागतीक पर्यावरण दिनानिमीत्त महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे आवारात केले वृक्षारोपण
थोडक्यात हकीकत :-
मा. भारत सरकार यांच्या ” नशामुक्त भारत अभियान” चे पार्श्वभूमीवर सांगली जिल्हयातील अंमली पदार्थाच्या वितरण व विक्री तसेच नशाखोरीवर अंकुश ठेवून अंमलीपदार्थ विक्री तसेच वितरण करणारे संशयित इसमांचे विरोधात प्रभावी व सातत्यपूर्ण कारवाईसाठी श्री. संदीप घुगे, मा. पोलीस अधिक्षक सांगली, श्री. प्रणिल गिल्डा, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, मिरज विभाग यांनी विशेष सूचना देवून गांजा विक्री करणारे लोकांवर प्रभावी कारवाई करुन गुन्हे दाखल करण्याबाबत आदेश दिले होते.
सदर आदेशाप्रमाणे संदीप शिंदे, सहा. पोलीस निरीक्षक, प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरज यांनी कारवाई करीत अंमली पदार्थांचा साठा, विक्री व वितरण करणारे इसमांबाबत माहीती उपलब्ध करुन त्यांचेवर प्रभावी कारवाई करण्यासाठी पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाकडील अधिकारी व अंमलदार यांना सुचित केले होते. त्यानुसार महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाने वेळोवेळी कारवाई करीत नशाखोरी व अंमलीपदार्थ विक्री रोखण्याचे अनुषंगाने पोलीस ठाणे हद्दीत प्रभावीपणे छापा कारवाई करून उत्कृष्ठ कामगिरी केली होती.
सदर अंमलीपदार्थ विरोधातील सातत्यपूर्ण व उत्कृष्ठ कारवाईची मा. पालकमंत्री, सांगली जिल्हा यांनी दखल घेत दि. ०१ मे २०२५ रोजीचे महाराष्ट्र दिनानिमीत्त आयोजित कार्यक्रमात महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाकडील अधिकारी व अंमलदार तसेच सांगली जिल्हयातील अंमली पदार्थ विरोधी कारवाई पथकाचे विशेष प्रशंसापत्र देवून सन्मानीत केले होते.
त्याचप्रमाणे दि. ०६.०६.२०२५ रोजी ज्येष्ठ सिने अभिनेते व वृक्षप्रेमी श्री. सयाजी शिंदे यांनी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेस सदिच्छा भेट दिली व महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेच्या तसेच सांगली जिल्हा पोलीस दलाच्या अंमली पदार्थ विरोधी सातत्यपूर्ण व उल्लेखनीय कारवाईचे जाहीरपणे कौतुक करीत श्री. संदीप घुगे, मा. पोलीस अधिक्षक सांगली, श्री. प्रणिल गिल्डा, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, मिरज विभाग तसेच संदीप शिंदे, सहा. पोलीस निरीक्षक, प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरज यांचे विशेष अभिनंदन करीत महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील पथकाचा सत्कार केला. तसेच जागतिक पर्यावरण दिनानिमीत्त महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेच्या आवारात श्री. सयाजी शिंदे यांनी वृक्षारोपण करीत तरुणाईला, व्यायामाला आपलेसे करीत रात्रीचे मित्र सोडा व सकाळचे मित्र जोडा असा संदेश देत मा. भारत सरकार यांच्या ” नशामुक्त भारत अभियान ” यशस्वी करणेसाठी आवाहन केले.