महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडून अवैधरीत्या वाळू चोरी व वाहतूक करणा-यांवर कारवाई, एकूण ८,२४,०००/- रु. चा वाळू व डंपर असा मुद्देमाल जप्त.

सह संपादक – रणजित मस्के

सांगली
पोलीस स्टेशन
महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरज
अपराध क्र आणि कलम
गु.र.नं. ८४/२०२५
भा.न्या.सं. कलम ३०३(२) सह महाराष्ट्र जमीन महसूल अधि. कलम ४८ (७)
गु.घ.ता वेळ व ठिकाण
दि. १३.०४.२०२५ रोजी २३,०० वा. हनुमान मंदीर ते माधवनगर जाणारे रोडवर झोपडपट्टीजवळ, मिरज
गु.दा.ता वेळ
दि. १४.०४.२०२५ रोजी ०३.०० वा.
फिर्यादी नाव
नानासाहेब लक्ष्मण चंदनशिवे, पोना/२१४०, नेम. महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरज
माहितीचा खोत
गोपनीय बातमीदारामार्फत पोना नानासाहेब चंदनशिवे
कारवाई करणारे पोलीस अधिकारी आणि अंमलदार
मा. श्री. संदीप पुगे, पोलीस अधीक्षक, सांगली
मा. श्रीमती रितू खोखर, अपर पोलीस अधिक्षक, सांगली
मा. श्री. प्रणिल गिल्डा, उपविभागीय पोलीस अधिकारी, मिरज विभाग श्री. संदीप शिंदे, सहा. पोलीस निरीक्षक, प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरज वांचे मार्गदर्शानाखाली
पोलीस उपनिरीक्षक श्रीमती रुपाली गायकवाड, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक धनंजय चव्हाण, पोलीस नाईक नानासाहेब चंदनशिवे, पोलीस कॉन्स्टेबल महेश मासाळ,
चालक श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सतीशकुमार पाटील
संशयित नाव
१) गोविंद गंगाष्पा राठोड, वय ४२, रा. धरणगुती, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर
व पत्ता
२) प्रविण देसाई, रा. जयसिंगपूर, जि. कोल्हापूर
जप्त मुद्देमाल
८,२४,०००/- रु. ची एकूण ४ ब्रास वाळू व वाळू वाहतुकीसाठी धापरलेला डंपर
गुन्ह्याची थोडक्यात हकीकत
सांगली जिल्हयात अवैध व्यवसाय करणारे संशयित इसमांचे विरोधात प्रभावी व सातत्यपूर्ण कारवाईसाठी श्री. संदीप पुगे, मा. पोलीस अधिक्षक सांगली, श्रीमती रितू खोखर, मा. अपर पोलीस अधिक्षक सांगली च श्री. प्रणिल गिल्डा, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, मिरज विभाग यांनी विशेष सूचना देवून गुन्हे दाखल करण्याबाबत आदेश दिले होते.
सदर आदेशाप्रमाणे संदीप शिंदे, सहा. पोलीस निरीक्षक, प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरज यांनी तात्काळ कारवाई करीत पोलीस ठाणेकडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे पथक तयार करुन अवैध व्यवसाय करणारे इसमांबाबत माहीती उपलब्ध करुन त्यांचेवर प्रभावी कारवाई करण्यासाठी त्यांना सुचित केले होते,
त्याप्रमाणे महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील पोलीस उपनिरीक्षक श्रीमती रुपाली गायकवाड यांचे पोलीस पथकातील पोलीस नाईक नानासाहेव चंदनशिवे यांना दि. १३.०४.२०२५ रोजी रात्री उशिरा गोपनीय माहीती मिव्खली की, हनुमान मंदीर ते माधवनगरकडे जाणारे रोडवर एका डंपर मधून बेकायदेशीरपणे विनापरवाना वाळू
वाहतूक होत असलेची खात्रीलायक बातमी मिळाली. सदर बातमीवरुन संदीप शिंदे, सहा. पोलीस निरीक्षक, प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरज यांनी तात्काळ महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील नमूद पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे पथकास रवाना करुन सदर बेकायदेशीरपणे चालू वाहतूक करणारे डंपरचर छापा टाकून जप्त करण्याचे आदेश दिले.
वरील प्रमाणे नमूद पथकातील अधिकारी व अंमलदार हे मिळाले बातमीप्रमाणे हनुमान मंदीर ते माचवनगरकडे जाणारे रोडवरील झोपडपट्टीजवळ सापळा रचून थांचले असता थोड्या वेळात सदर ठिकाणी अवैधरीत्या वाळूची चोरटी वाहतूक करणारा एक निळे-पांढरे रंगाचा डंपर येताना दिसला, त्याचा मिळाले बातमीप्रमाणे संशय आल्याने नमूद पोलीस पथकाने सदरच्या डंपर चालविणारे चालकास कंपरसहीत पळून जाणेची संधी न देता सदरचा डंपर शिताफीने यांचवून त्याचेचरील चालकास ताब्यात घेवून त्याचेवर कायदेशीर कारवाई करीत त्याचेकडून बेकायदेशीररीत्या उत्खनन केलेली ४ ब्रास चोरटी वाळू व सदर चोरट्या वाळूची अवैधरित्या वाहतूक करणेसाठी वापरणेत आलेला डंपर असा एकूण ८,२४,०००/- रु. चा मुद्देमाल जप्त केला असून त्याचेकडे कौशल्यापूर्ण तपास केला असता, सदरची बेकायदेशीररीत्या उत्खनन केलेली चोरटी वाळूची वाहतूक त्याने त्याचा मालक प्रविण देसाई, रा. जयसिंगपूर, जि. कोल्हापूर याचे सांगणेवरुन केली असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास मा. वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे कडील पोलीस उपनिरीक्षक श्रीमती रुपाली गायकवाड हे करीत आहेत.
महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडून अवैध व्यवसाय करणा-या व्यवस्थेची पाळेमुळे खणून काढणेच्या अनुषंगाने जास्तीत जास्त प्रभावी कायदेशीर कारवाई करुन अवैध व्यवसायाचा समूळ बीमोड करण्याच्या उपाययोजना राबविण्यात येत असून नागरीकांनी अवैध व्यवसायाबाबत माहीती पोलीस प्रशासनास देण्याचे महात्मा गांची चौक पोलीस ठाणेतर्फे आवाहन करण्यात येत आहे.