महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीत गांजा विक्री करणारा इसम जेरबंद, ०२ किलो ३०० ग्रॅम वजनाचा तयार गांजा जप्त..

सह संपादक- रणजित मस्के
मिरज ;
पोलीस स्टेशन
महात्मा गांधी चीक पोलीस ठाणे, मिरज
अपराध क्र आणि कलम
गु.र.नं. ३७/२०२५ गुंगीकारक औषधीद्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधि. कलम ८(क), २० (च) ii (4), २२ (ब) प्रमाणे
फिर्यादी नाथ
नानासाहेव लक्ष्मण चंदनशिवे, पोना २१४०, नेम, महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरज
गु.घ.ता वेळ व ठिकाण
दि. १४.०२.२०२५ रोजी २०.२० चा. रजपुत गार्डन मंगल कार्यालय जवळील कोल्हापुर ते पंढरपुर जाणारे एनएच १६६ चे उड्डाण पुलाखाली, मिरज
गु.दा.ता वेळ दि. १५.०२.२०२४ रोजी ०१.४६ वा
माहितीचा स्वोत
पोना/२१४० नानासाहेब चंदनशिवे
कारवाई करणारे पोलीस अधिकारी आणि अंमलदार
मा. श्री. संदीप घुगे, पोलीस अधीक्षक, सांगली
मा. श्रीमती रितू खोखर, अपर पोलीस अधिक्षक, सांगली मा. श्री. प्रणिल गिल्डा, उपविभागीय पोलीस अधिकारी, मिरज विभाग श्री. संदीप शिंदे, सहा. पोलीस निरीक्षक, प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरज यांचे मार्गदर्शनाखाली
पोलीस उपनिरीक्षक श्री संदीप गुरख, राजेंद्र कलगुटकर, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक धनंजय चव्हाण, पोलीस हेडकॉन्स्टेबल अभिजीत धनगर, अभिजीत पाटील, सूरज पाटील, पोलीस नाईक राहूल क्षीरसागर, नानासाहेच चंदनशिवे, पोलीस कॉन्स्टेबल विनोद चव्हाण, जावेद शेख, मोहसिन टिनमेकर चालक श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सतीशकुमार पाटील, चालक सहा. पोलीस उपनिरीक्षक सुनिल कांचळे
संशयित नाव व पत्ता
१) धनंजय बव्ययंत भोसले, वय ३३ वर्षे, रा. साई मंदीर पाठीमागे, एमआयडीसी रोड, मिरज, ता. मिरज, जि. सांगली
२) सुरज नागनाथ सरवदे, रा. रविवार पेठ, जोशी गल्ली, आर. के. कोल्ड्रींक जवळ, सोलापुर, जि. सोलापुर (परागंदा)
जप्त मुद्देमाल एकुण ५७,५१०/- रु. किंमतीचा ०२ किलो ३०० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे. गुन्ह्याची थोडक्यात हकीकत :-
मा. भारत सरकार यांच्या ” नशामुक्त भारत अभियान” चे पार्श्वभूमीवर सांगली जिल्हयातील वाढत्या अंमली पदार्थाच्या वितरण व विक्री तसेच नशाखोरीचर अंकुश ठेवून अंमलीपदार्थ विक्री तसेच वितरण करणारे संशयित इसमांचे विरोधात प्रभावी च सातत्यपूर्ण कारवाईसाठी श्री. संदीप घुगे, मा. पोलीस अधिक्षक
सांगली, श्रीमती रितू खोखर, मा. अपर पोलीस अधिक्षक सांगली व श्री. प्रणिल गिल्डा, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, मिरज विभाग यांनी विशेष सूचना देवून गांजा विक्री करणारे लोकांवर प्रभावी कारवाई करुन गुन्हे दाखल करण्याबाबत आदेश दिले होते.
सदर आदेशाप्रमाणे संदीप शिंदे, सहा. पोलीस निरीक्षक, प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरज यांनी तात्काळ कारवाई करीत अंमली पदार्थांचा साठा, विक्री व वितरण करणारे इसमांवावत माहीती उपलब्ध करुन त्यांचेवर प्रभावी कारवाई करण्यासाठी पोलीस ठाणेकडील डि.बी. पथकाकडील अधिकारी व अंमलदार यांना सुचित केले होते.
त्याप्रमाणे दि. १४.०२.२०२५ रोजी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे कडील पोना/नानासाहेब चंदनशिवे यांना गोपनीय माहीती मिळाली की, इसम नामे धनंजय भोसले हा नशेसाठी वापरण्यात येणारा गांजा नामक अंमली पदार्थाची विक्री करणेसाठी मिरज येथील रजपूत गार्डन मंगल कार्यालय जवळील कोल्हापुर ते पंढरपुर जाणारे एनएच १६६ चे उड्डाण पुलाखाली येणार आहे, अशी खात्रीलायक बातमी मिळाली. सदर बातमीवरुन संदीप शिदे, सहा. पोलीस निरीक्षक, प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरज यांनी तात्काळ महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील डी.बी. पथकास रवाना करुन सदर इसमावर छापा टाकून गांजा जप्त करण्याचे आदेश दिले.
वरील प्रमाणे नमूद डी. बी. पथकातील अधिकारी व अंमलदार हे मिळाले बातमीप्रमाणे मिरज येथील रजपूत गार्डन मंगल कार्यालय जवळील कोल्हापुर ते पंढरपुर जाणारे एनएच १६६ चे उड्डाण पुलाखाली पंच, फोटोग्राफर यांचेसह जावून तेथे सापळा रचून थांबले असता थोड्या वेळात सदर विकाणी हातात केसरी रंगाची कापडी पिशवी घेवून एक संशयित इसम येवून थांचला. त्याचा मिळाले बातमीप्रमाणे संशय आल्याने नमूद पोलीस पथकाने त्यास पळून जाणेची संधी न देता शिताफीने ताब्यात घेवून त्याचेवर कायदेशीर कारवाई करीत संशयित इसम नामे धनंजय बळवंत भोसले, वय ३३ वर्षे, रा. साई मंदीर पाठीमागे, एमआयडीसी रोड, मिरज, ता. मिरज, जि. सांगली याचेकडून अवैधरित्या नशा करण्यासाठी वापरण्यात येणारे गांजा नामक अंमली पदार्याचा एकूण ५७,५१०/- रु. किंमतीचा ०२ किलो ३०० ग्रॅम वजनाचा तयार गांजामालाचा साठा जप्त केला असून त्याचेकडे कौशल्यापूर्ण तपास केला असता, त्याने सदरचा तयार गांजामाल गुन्हयातील इतर संशयित नामे सुरज नागनाथ सरवदे, रा. सोलापूर याचेकडून मागवून मिरज परीसरात किरकोळ स्वरुपात विक्री करुन वितरण करीत असल्याचे निष्पन्न झालेले आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास मा. वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे कडील पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र कलगुटकर हे करीत आहेत.