महात्मा गांधी चौक, पोलीस ठाणे, मिरज यांची कारवाई हायवेवरील जबरी चोरी करणारा चोरटा जेरबंद

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

मिरज

महात्मा गांधी चौक, पोलीस ठाणे, मिरजगु.घ.ता., वेळगु.र.नं. व कलमगु.र.नं.२९६/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (४), ३ (५) प्रमाणे.गु.दा.ता., वेळदि.२२/१२/२०२४ रोजीचे पहाटे ०३.१५ वा ते ०३.३० वा. चे दरम्यान मुदतीतदि. २२/१२/२०२४ रोजी १५.३९ वा.कारवाई करणारे अधिकारी व अंमलदारमा.श्री संदीप घुगे सोो, पोलीस अधीक्षक, सांगली,फिर्यादी नावनारायण विष्णु माळी, रा. लिमये मळा, धामणी रोड, सांगली, जि. सांगलीमाहितीचा स्त्रोतपोकॉ/६२५ जावेद शेख, पोकों/१११२ मोसीन टिनमेकरमा. श्रीमती रितु खोकर साो, अप्पर पोलीस अधीक्षक, सांगलीमा.श्री.प्रणिल गिल्डा सोो, उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग मिरज, श्री संदीप शिंदे, सहा. पोलीस निरीक्षक, महात्मा गांधी चौक, पोलीस ठाणे, मिरज यांचे मार्गदर्शनाखालीपोउनि श्री संदीप गुरव, १) श्रेणी पोउनि धनंजय चव्हाण, २) पोहेकॉ/१२६१ सुरज पाटील,३) पोहेकों/२७७ अभिजीत धनगर, ४) पोकों/६२५ जावेद शेख, ५) पोकॉ/१११२ मोहसिन टिनमेकर,६) पोकॉ/७३७ विनोद चव्हाण, ७) पोकों/१३० बसवराज कुंदगोळआरोपीचे नाव व पत्ता१) सुमित शत्रुघ्न काळे, वय १९ वर्षे, रा. माजिसैनिक वसाहत पारधी वस्ती, मिरज, ता. मिरज, जि. सांगली, २) जितु चव्हाण, सध्या रा. पारधी वस्ती, मिरज (पुर्णनाव व मुळ पत्ता माहित नाही) (परागंदा)३) जितु चव्हाण याचा मित्र (नाव पत्ता माहित नाही) (परागंदा)जप्त मुद्देमाल१) ४,०००/- रु एक काळ्या रंगाचे टायटन कंपनीचे मॉडेल क्र. 90014 असे असलेले पडघाळ जु.वा.कि.अं २) २५,०००/- रु त्यामध्ये एक काळ्या मण्याचे मणी मंगळसुत्र (तुटलेले) त्याचे मध्यभागी दोन सोन्याच्यावाट्या असलेले परंतु त्यातील एक सोन्याच्या साखळीतील पदर नसलेले त्याचे वजन ६.५९० ग्रॅम जु.वा.कि.अं३) १०,०००/- रु त्यामध्ये एक नक्षीकाम असलेली अंगठी अशा एकुण अंदाजे १.९२० ग्रॅम वजनाचे असलेले जु.वा.कि.अं४) २००/- रु त्यामध्ये एक लोखंडी चाकु त्यास लोखंडी हिरव्या पिवळ्या रंगाची मुठ असलेला त्याची एकुण लांबी ११ इंच असुन निव्वळ पात्याची लांबी ०७ इंच असा एकाबाजुस धारदार असलेला जु.वा.कि.अंएकुण- ३९,२००/- रु.दि.२२/१२/२०२४ रोजीचे पहाटे ०३.१५ वा ते ०३.३० वा. चे दरम्यान मुदतीत मिरज, ता. मिरज, जि. सांगली हद्दीत सोलापुर-कोल्हापुर हायवेवरील अर्जुनवाड फाट्यावरील पुल उतरुन कृष्णाघाट कवुन येणारे सर्वीस रोड जुळलेल्या ठिकाणी हायवेवर रोडचे कडेला थांबलेल्या कारचा दरवाजा उघडुन तीन आरोपींनी चाकुचा धाक दाखवुन जबरी चोरी केलेबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक, महात्मा गांधी चौक, पोलीस ठाणे, मिरज यांनी त्यांचे तपास पथकास त्यांचे दालनात बोलावुन घेवुन सदर गुन्ह्यातील मुद्देमाल व आरोपी शोधुन आणण्याचे आदेश दिलेले होते. त्याप्रमाणे तपास चालु असताना तपास पथकातील पोकॉ/६२५ जावेद शेख व पोकॉ/१११२ मोसीन टिनमेकर यांना त्यांचे गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, दाखल गुन्ह्यातील गेले मुद्देमालाप्रमाणे काही मुद्देमाल सुमित काळे, रा. पारधी वस्ती, मिरज हा विक्रीकरीता नशेमन हॉटेल, मिरज जवळ येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने तपास पथकाने तत्परता दाखवुन बातमीप्रमाणे सापळा रचुन आरोपी सुमित शत्रुघ्न काळे, वय १९ वर्षे, रा.माजिसैनिक वसाहत पारधी वस्ती, मिरज, ता. मिरज, जि. सांगली यास ताब्यात घेवुन त्याचेकडुन सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेला वरील प्रमाणे मुद्देमाल एक टायटन कंपनीचे घड्याळ, एक सोण्याचे मणीमंगळसुत्र, एक सोण्याची अंगठी आणि गुन्हा करतेवेळी वापरलेला चाकु असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदर आरोपी हा सध्या पोलीस कस्टडीत असुन त्याचेकडे अधीक तपास सुरु आहे.सदर कामगिरी ही सहा. पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव, श्रेणी पोउनि धनंजय चव्हाण, पोहेकॉ/१२६१ सुरज पाटील, पोहेकॉ/२७७ अभिजीत धनगर, पोकॉ/६२५ जावेद शेख, पोकॉ/१११२ मोसीन टिनमेकर, पोकॉ/७३७ विनोद चव्हाण, पोकॉ/१३० बसवराज कुंदगोळ यांनी कौशल्यपूर्वक पार पाडलेली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट