महाराष्ट्रातील पहीले मानांकन प्राप्त झालेल्या शिराळा पोलीस ठाण्याला सुरक्षा पोलीस टाइम्स तर्फे मानाचा मुजरा …

सांगली :सांगली जिल्ह्यातील शिराळा पोलीस ठाणे या पोलीस ठाण्याला राज्यात 1 ले तर देशात 7 व्या क्रमांकाचे पोलीस ठाणे म्हणून गौरविण्यात आले .
केंद्रीय गृह मंत्रालया मार्फत सर्वोत्तम पोलीस ठाण्यांची निवड करण्यासाठी आणि श्रेणी देण्यासाठी व मूल्यांकन करण्यासाठी वार्षिक सर्वेक्षण केले जाते. या निवडक दहा पोलीस ठाण्यांची नावे वार्षिक परिषदे दरम्यान जाहीर केली जातात देशात 7 वा तर राज्यात पहिला क्रमांक शिराळा पोलीस ठाणे यानी पटकावला आहे.
यामुळे शिराळा शहराचे नाव देशभर प्रसिद्धीस आले आहे. पोलीस ठाण्यात जाताना सामान्य नागरिक परिसराचा झालेल्या कायापालटमुळे आणि मिळणाऱ्या वागणुकीमुळे समाधान व्यक्त करत आहे. या संदर्भातील प्रमाणपत्र राज्य, केंद्रशासित प्रदेशातील दहा पोलीस ठाण्यांना देखील प्रदान केले जाणार आहे.
केंद्रीय गृह मंत्रालया मार्फत सर्वोत्तम पोलीस ठाण्यांची निवड करण्यासाठी आणि श्रेणी देण्यासाठी व मूल्यांकन करण्यासाठी वार्षिक सर्वेक्षण करते. यात निवडक 10 पोलीस ठाण्याची नावे वार्षिक परिषदे दरम्यान जाहीर केली जातात. यासाठी सल्लागार फर्म म्हणून मेसर्स ट्रान्सरूरल अॅग्री कन्सल्टिंग सर्व्हिसेस प्रा. लि.ला गृहमंत्रालयाने देशातील सर्वोत्तम पोलीस ठाणे ओळखण्यासाठी सर्वेक्षणाच्या अंमलबजावणीची जबाबदारी दिली होती . या टीमने शिराळा पोलीस ठाण्याला भेट दिली होती .
याबाबत अंतिम निर्णय होऊन शिराळा पोलीस ठाणे देशामध्ये सातवा तर राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. याबाबत विभागीय पोलीस अधीक्षक श्री.कृष्णात पिंगळे, पोलीस निरीक्षक श्री. सुरेश चिल्लावार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री. गजेंद्र लोहार, पोलीस उपनिरीक्षक श्री. अविनाश वाडेकर तसेच येथील इतर अधिकारी व कर्मचारी वर्गाने पोलीस ठाण्याचा कायापालट केला आहे.
पोलीस ठाण्याची इमारत, परिसर, याठिकाणी केलेली वृक्ष लागवड,विद्युत रोषणाई, स्वच्छता, सोयी सुविधा, गुन्हे, रेकॉर्ड, गुन्हे तपास, अधिकारी व कर्मचारी वर्गाचे नागरिकांशी सुसवांद, गुन्हे निर्गती प्रमाण, सिसिटीव्ही, फलक अद्यावत आदी गोष्टी ची तपासणी व पाहणी केली जाते.
पोलीस ठाण्यात येणाऱ्या नागरिकांना समाधान वाटावे असे वातावरण निर्माण करावे लागते त्यानंतरच हे मानांकन प्राप्त होते.या सर्व शिराळा पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना सुरक्षा पोलीस टाइम्स तर्फे मानाचा मुजरा.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
dipakbhogal@surakshapolicetimes.com