महाराष्ट्राच्या पालघर या जिल्हाची आदिवासी लोकसंस्कृति थेट राजस्थानच्या राजभवनात अन महाराष्ट्रातुन प्रथमच राजस्थानाच्या गावात घरकुल अभियंता विक्रम गावंडे यांच्या कडून शाळकरी मुलांना शैक्षणिक भेट..!

उपसंपादक : मंगेश उईके
पालघर:- राजस्थान राज्याच्या राजभवनात महामहिम राज्यपाल हरिभाऊ बागडेजी यांना पालघर जिल्हातील घरकुल अभियंता विक्रम दिपक गावंडे यांनी पालघर जिल्हाची आदिवासी लोकसंस्कृति दर्शवणारे तारपा वादय याची प्रतिकृति डॉ.गजानन पाईकराव यांच्या समवेत सप्रेम भेट म्हणुन दिली. त्याच बरोबर पालघर जिल्ह्यात प्रामाणिकपणे घरकुल अभियंता म्हणुन काम करत असताना सामाजिक बांधीलकी चे भान ठेवुन गरीब व गरजु विद्यार्थ्यां ना शिक्षणा करीता लागणारे साहित्य दुरवर वसलेल्या गाव पातळी वर जाऊन वाटप करत असल्याची माहिती मा.राज्यपाल महोदय यांना दिली.या बद्दल मा.राज्यपाल महोदय यांनी केलेल्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.



त्याचबरोबर राजस्थान राज्यातील गाव .नारायणपुरा ता.बाँदीकुई जि.दौसा येथील राजकीय उच्च प्राथमिक शाळेतील सर्व गरीब व गरजु विद्यार्थ्यांना तसेच शिक्षाकांना सुद्धा शाळेत पाण्याची कमतरता असल्या कारणाने घरुन येताना पाणी पिण्या करीता उत्तम दर्जाचे पिण्याच्या पाण्याच्या बॉटल वाटप करण्यात आल्या. महाराष्ट्राच्या मातीतुन राजस्थान राज्यातील सदर गावाला मिळालेली हि मदत प्रथमच आहे असे सदर उपक्रमास उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी सांगितले . सदरील उपक्रमास विक्रम गावंडे यांच्या सोबत डॉ.गजानन पाईकराव यांचे मोलाचे सहकार्य लाभले त्यांच् बरोबर नारायणपुरा येथील ग्रामस्थ , पंचायत समिति सदस्य, शाळेतील सर्व शिक्षक तसेच मुख्याध्यापक यांनी उपस्थित राहुन सर्वांच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करून महाराष्ट्रा प्रति आपले प्रेम व्यक्त केले.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे समाजातील प्रत्येक दुर्बल घटकास शिक्षण मिळावे हि इच्छा व ज्या प्रमाणे बाबासाहेब म्हणतात की” शिक्षण हे वघिनिचे दुध आहे अन जो ते प्राशन करेल तो वाघासरखा गुर गुरल्याशिवाय राहणार नाही ” यांच्या विचारांचा आदर्श घेऊन कोणीही विद्यार्थी शिक्षणापासुन वंचित राहु नये हे बाबासाहेबांचे स्वप्न पुर्ण व्हावे व आपल्या भारतातील प्रत्येक दुर्लक्षित भागात माझ्या हातुन शिक्षणाची बीजे रोवली जावी हिच आशा विक्रम दिपक गावंडे यांनी व्यक्त केली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com