महाराष्ट्राचे गृहमंत्री यांस चंद्रपूर येथील 140 पोलीस अंमलदाराना आंतर जिल्हा बदलीचे निवेदन-पोलीस बॉईज असोसिएशन-श्री. प्रमोद वाघमारे (संस्थापक अध्यक्ष)

प्रतिनिधी-रणजित मस्के

चंद्रपूर: बुधवार दिनांक 21 सप्टेंबर 2022 रोजी पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य शाखा चंद्रपूर जिल्हा तर्फे जिल्हाधिकारी साहेब चंद्रपूर यांचे मार्फत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री मा. देवेंद्र फडणवीस साहेब यांना गडचिरोली जिल्हा पोलीस दलातील 10 वर्षांपेक्षा जास्त काळ सेवा झालेले 140 पोलीस अंमालदार यांची आंतर जिल्हा बदली तात्काळ करण्यात यावी या मागणीचे निवेदन देण्यात आले.


यावेळी निवेदन देताना पोलीस बॉईज असोसिएशनचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष तथा विदर्भ अध्यक्ष भुवनेश्वर निमगडे , यांच्यासह चंद्रपूर महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सौ. सविताताई खुटेमाटे , यांच्यासह महिला पदाधिकारी उपस्थित होते.
तसेच प्रमोद तानाजी वाघमारे संस्थापक अध्यक्ष (पोलीस बॉईज असोसिएशन( महाराष्ट्र राज्य)
मो : 9604972682 / 8669838008 याच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन देण्यात आले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com