महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग व महिला व बाल विकास विभाग, युनिसेफ यांचे संयुक्त विदयमाने संपन्न झालेल्या बाल स्नेही पुरस्कार सन्मान सोहळा..

0
Spread the love

सह संपादक- रणजित मस्के

सातारा

सातारा जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखे अंतर्गत भरोसा सेल कक्ष स्थापित असून मा. समीर शेख पोलीस अधीक्षक सो, मा. श्रीमती वैशाली कडूकर अपर पोलीस अधीक्षक सो, श्री. अरुण देवकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली सदर कक्षा अंतर्गत विशेष बाल पथक कार्यरत आहे विशेष बाल पथकांअंतर्गत घटक स्तरावर विशेष बाल कक्ष विधी संघर्षग्रस्त बालकांकरीता कामकाज करीत आहे. पोलीस स्टेशन स्तरावर नेमण्यात आलेले बाल कल्याण पोलोस अधिकारी यांना सुध्दा वेळोवेळी वि.स. बालकांबाबत सुचित करण्यात येत असून कामकाजांच्या पध्दती बालन्याय मंडळाच्या सूचनाबाबत वेळोवेळी कामकाजाचा पाठपुरावा करण्यात येत आहे. सन २०२४ मध्ये घटक स्तरावर बालकांची एकही तक्रार नाही कराड शहर पोलीस ठाणे अंतर्गत चालस्नेही प्रकल्प पिडीत बालकांकरीता चालू करुन बालकांना एका स्वतंत्र खोलीत बालस्नेहो वातावरण तयार करण्यात आले आहे. वेळोवेळी चालकल्याण समितीमार्फत जिल्हयातील बालकांच्या येणाऱ्या विविध तक्रारीचे निरसन केले जात आहे. विशेष बाल पोलीस कक्षाअंतर्गत राष्ट्रीय बाल हक्क संक्षण आयोग नवी दिल्ली यांचेकडुन येणाऱ्या लेखी तक्रारींचा आढावा घेवून योग्य ती कारवाई करुन NCPCR नवी दिल्ली यांना अहवाल पाठविले जातात.

राज्यात बालकांच्या सर्वांगीण विकास बाल हक्क संरक्षण त्यांची सुरक्षा, आयोग इत्यादी अनेक महत्वपूर्ण विषयावर अनेक प्रशासकीय यंत्रणा, बालगृह, बाल कल्याण समिती इत्यादी यंत्रणा संस्था या सकारात्मक पध्दतीने मोलाचे कार्य पार पाडत आहेत. अशा व्यक्ती /संस्थाना बाल स्नेही पुरस्काराने सन्मानित करण्यासाठी आयोग व महिला बाल विकास विभाग, सुनिसेफ यांचे संयुक्त विदयमाने राज्य स्तरीय बालस्नेहो पुरस्कार २०२४ करीता सातारा जिल्हयामध्ये कराड शहर पोलीस ठाणे येथे बाल स्नेही कक्ष स्थापन असून महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग व्दारा आयोजित बालस्नेही पुरस्कार २०२४ याकरीता अॅड. सुशीथेन शाह अध्यक्षा, बाल हक्क संरक्षण आयोग महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे हस्ते उत्कृष्ठ पोलीस हवालदार श्रेणीमध्ये श्री.पी.व्ही वाघमारे नेमणूक भरोसा सेल स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांनी बालकांच्या क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी केल्याबददल त्यांना महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगामार्फत बालस्नेही पुरस्कार ने गौरविण्यात आले आहे, तसेच राज्य बाल हक्क आयोगाचे माननीय सदस्य अॅड. निलिमा चकाण अॅड. संजय सेंगर, अॅड.प्रज्ञा खोसरे अॅड जयश्री पालवे श्रीमती सायली पालखेडकर, श्री चैतन्य पुरंदरे यांचे उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.

सदरचा पुरस्कार प्राप्त झालेवाबत मा. समीर शेख पोलीस अधीक्षक मा. श्रीमती वैशाली कडूकर अपर पोलीस अधीक्षक मा.श्री. अतुल सबनीस पोलीस उपअधीक्षक (गृह) सातारा, श्री. अरुण देवकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस, श्रीमती श्वेता पाटील पोलीस उपनिरीक्षक भरोसा सेल सातारा यांनी अभिनंदन करुन अशाच पुढील चांगल्या कामगिरीबाबत शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट