महाराष्ट्र राज्याचे अपर पोलीस महासंचालक श्री.विनय कारगांवकर यांचे हस्ते नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे विविध कार्यक्रम संपन्न…

0
Spread the love

प्रतिनिधी-रणजित मस्के

नंदुरबार: महाराष्ट्र राज्याचे अपर पोलीस महासंचालक श्री. विनय कारगांवकर हे दिनांक 17/10/2022 ते दिनांक 19/10/2022 रोजी पावेतो नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वार्षिक तपासणीसाठी नंदुरबार येथे आले होते.

अपर पोलीस महासंचालक श्री. विनय कारगांवकर यांचे हस्ते नंदुरबार शहर पोलीस ठाण्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. रक्तदान शिबीरात नंदुरबार शहरातील विविध सामाजिक संघटना, पोलीस मित्र तसेच पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सहभाग नोंदविला. सदर रक्तदान शिबीरात एकुण 101 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

त्यानंतर नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे पोलीस अधिकारी, अंमलदार व त्यांच्या कुटुंबीयांसाठी उभारण्यात आलेल्या वाचनालयाचे उद्घाटन करुन नंदुरबार पोलीस दल हे पोलीसांसाठी व पोलीस पाल्यांसाठी करीत असलेल्या चांगल्या उपक्रमांचे कौतुक केले.

पोलीस ठाणे आवारातच आधुनिक वाचनालय सुरु केल्याने नंदुरबार शहर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व अमंलदारासोबत त्यांच्या कुटुंबीयांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

तसेच नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांना नोंद असलेल्या गहाळ मोबाईलबाबत नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.पी.आर. पाटील यांनी माहिती घेतली असता मोठ्या प्रमाणावर मोबाईल हरविल्याच्या तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या. त्यानुसार नंदुरबार जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यात तक्रारदारांनी मोबाईल हरविल्याबाबत दिलेल्या तक्रारींचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.रविंद्र कळमकर यांचे नेतृत्वाखाली तांत्रिक विश्लेषण शाखेने विश्लेषण करुन नंदुरबार, धुळे, जळगांव जिल्ह्यात व गुजरात, मध्य प्रदेश राज्यात जावुन त्यांचा शोध घेवुन त्यांचेकडुन मोबाईल हस्तगत करण्यात आले.

हस्तगत करण्यात आलेले 9 लाख 55 हजार रुपये किमतीचे 100 मोबाईल महाराष्ट्र राज्याचे अपर पोलीस महासंचालक श्री. विनय कारगांवकर यांनी मुळ तक्रारदारांपैकी 25 तक्रारदारांना प्रातिनिधीक स्वरुपात परत करण्यात आले. हरविलेल्या मोबाईलचा शोध घेवून ते प्राप्त करून मुळ तक्रारदारांना परत करण्याच्या कामगिरीत नंदुरबार जिल्हा अग्रेसर राहिला आहे. चोरीस गेलेली मालमत्ता व हरविलेले मोबाईल परत मिळाल्याने उपस्थितांमध्ये समाधान व्यक्त झाले.

तसेच नंदुरबार जिल्ह्यात दाखल असलेले मालमत्तेविरुध्दचे गंभीर गुन्हे उघडकीस आणून गुन्ह्यातील हस्तगत मुद्देमालापैकी 86,23,135/- रुपये किमतीचा 24 गुन्ह्यातील मुद्देमाल महाराष्ट्र राज्याचे अपर पोलीस महासंचालक श्री. विनय कारगांवकर यांच्या हस्ते परत करण्यात आले.

जेव्हा एखादी दुर्घटना किंवा अपघात होतो त्यावेळेस अत्याधिक रक्तस्त्राव झाल्यामुळे त्या व्यक्तीला रक्ताची आवश्यकता असते, परंतु जागरुकतेच्या अभावामुळे कुणीही अपघातग्रस्त इसमाला किंवा गरजु व्यक्तीला रक्तदान करीत नाही परंतु रक्तदान केल्यामुळे कोणाचा जीव वाचत असेल तर निश्चितच रक्तदान करायला हवे. रक्तदान हे खरे जीवनदान असून नियमित रक्तदान केल्याने नवीन रक्त निर्मिती होते जे निरोगी शरीरासाठी फायदेशीर असते.

तसेच सर्वसामान्य नागरिकांचा चोरी झालेला मुद्देमाल तसेच हरविलेले किंवा गहाळ झालेले मोबाईल त्यांच्या मनाशी निगडीत असतात. त्यामुळे चोरीस गेलेला मुद्देमाल मुळ फिर्यादीस विनाविलंब परत करण्याचा नंदुरबार पोलीस दलाचा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. तसेच असे मुद्देमाल परत करण्याचे कार्यक्रम महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये देखील राबवावे त्यामुळे जनतेमध्ये पोलीस दलाबद्दल विश्वास वाढण्यात मदत होईल, असे महाराष्ट्र राज्याचे अपर पोलीस महासंचालक श्री. विनय कारगांवकर यांनी मनोगतमध्ये व्यक्त केले.

सदर कार्यक्रमाच्या वेळी महाराष्ट्र राज्याचे अपर पोलीस महासंचालक श्री. विनय कारगांवकर नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी.आर.पाटील, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. सचिन हिरे, अक्कलकुवा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. संभाजी सावंत, स्थानिक गुन्हे शोखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर, नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार खेडकर, इतर सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व अमंलदार उपस्थित होते.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *