महाराष्ट्र पोलीस बाॅईज संघटनेच्या मागणीला अखेर यश-अध्यक्ष श्री. राहुल दुबाले …!

प्रतिनिधी-रणजित मस्के
मुंबई: महाराष्ट्र पोलीस बाॅईज संघटनेला आणखीन एक यश पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या मंजूर केल्या.
मंत्रालयातील कॅबिनेट मध्ये हा अति महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री मा.श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याशी संस्थापक अध्यक्ष श्री. राहुल दुबाले यानी सतत पाठपुरावा करून ही गोष्ट पोलीस कर्मचाऱ्यांच्या मार्गी लावली आहे.
लवकरच मुंबई पोलिसांचा प्रवास भत्ता आणि पोलीस परिवार महामंडळ स्थापन करण्यासाठी शासन निर्णय घेईल आणि आम्ही पाठपुरावा करू असे आश्वासन संस्थापक अध्यक्ष श्री. राहुल दुबाले यांच्या तर्फे देण्यात आले.तसेच सुट्टीची मागणी मान्य केल्याबद्दल त्यानी देवेंद्र फडणवीस यांचे विशेष आभार मानले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com