महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या वतीने नाशिक शहरात वॉटरग्रेस प्रॉडक्ट्स ठेकेदार विरोधातल्या आंदोलनास यश…

प्रतिनिधी-दिप्ती भोगल
नाशिक: नाशिक शहरात वाॅटरग्रेस प्रॉडक्ट्स ठेकेदार असलेल्या आस्थापनाने बेकायदेशीर रित्या तडका फडकी स्वच्छता कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले होते.
मनसे सरचिटणीस आणि महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे अध्यक्ष-डॉ. मनोज चव्हाण, कार्याध्यक्ष-संतोष धुरी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती आणि ज्येष्ठ कार्यसम्राट नगरसेवक-सलीम मामा शेख तसेच महाराष्ट्र नवनिर्माण कामगार उपाध्यक्ष- परशुराम साळवे, प्रदेश चिटणीस-तुषार जगताप, म्युनिसिपल कर्मचारी सेनेचे उपाध्यक्ष- पृथ्वीराज येरुणकर, मनविसे प्रदेश उपाध्यक्ष-संदीप भवर, मनविसे जिल्हाध्यक्ष-गणेश मोरे,मनसे उपशहराध्याक्ष- संतोष कोरडे, जनहित कक्षाचे जिल्हा अध्यक्ष प्रफुल बनभेरू, शाखाध्यक्ष- अजिंक्य शिर्के,राहुल पाटील,पंकज दातीर आणि कार्यकर्ते यांनी नाशिक महानगरपालिकेच्या मुख्य द्वारासमोर धरणे आंदोलन केले.



या आंदोलनाच्या वेळी कामगारांनी प्रचंड प्रतिसाद देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर विश्वास दाखवत सक्रिय सहभाग घेतला याची परिणीती आंदोलन यशस्वी करण्यात झाली आणि नाशिक महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त-श्री अत्राम साहेब यांनी आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाला भेटीसाठी निमंत्रित केले.



यावेळी शिष्टमंडळाने कामगारांच्या वतीने जोरदार बाजू मांडली. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त- श्री अत्राम साहेब यांनी वाटरग्रेस प्रॉडक्ट्स चे चेतन बोरा यांना दूरध्वनीवर संपर्क साधून कामगारांना कामावर रुजू करून घेण्याचे आदेश दिले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com