महाराष्ट्रात स्थानिक गुन्हे शाखा धुळे पोलीसांची अतिउल्लेखनीय कामगिरी 76 लाख रु.किमतीचा गुटखा केला जप्त…

0
Spread the love

प्रतिनिधी-रणजित मस्के

धुळे : दिनांक २२ सप्टेंबर २०२२ रोजी महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला लाखो रुपयाचा गुटखा स्थानिक गुन्हे शाखेकडून जप्त. परराज्यातुन महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला गुटखा पानमसाल्याची विक्री करण्याच्या उद्येशाने तस्करी होत असल्याचे मा. पोलीस अधीक्षक श्री. प्रविणकुमार पाटील, धुळे यांनी पोलीस निरीक्षक श्री.हेमंत पाटील, स्थानिक गुन्हे शाखा, धुळे यांना सुचना देऊन कारवाई करणे बाबत आदेशीत केले होते.

सदर आदेशानुसार माहिती प्राप्त करीत असतांना दिनांक 22 सप्टेंबर २०२२ रोजी पोसई/बाळासाहेब सूर्यवंशी, स्था.गु.शा. धुळे यांना गुप्तबातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की, हंस ट्रॅव्हल्स कंपनीच्या ट्रॅव्हल्स क्रमांक 1) NL 07 B 0541 व 2) NL 07 B 0545 यामध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला राजनिवास सुंगधीत पानमसाला गुटख्याची वाहतुक होत असुन सदर वाहने सोनगीर कडुन धुळे दिशेने येत असल्याची माहिती खात्रीशीर माहिती प्राप्त झाल्याने पोसई/बाळासाहेब सुर्यवंशी यांनी प्रभारी.पो.निरी.श्री.सतिष गोराडे यांना सदर बातमीची हकीगत सांगितली असता, त्यांनी स्था.गु.शा. धुळे येथील पथकास नमुद बातमीची खात्री करुन पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करणे बाबत आदेशीत केले.

सदर पथकाने अवधान टोल नाका धुळे येथे सापळा रचून पहाटे ०५.०० वाजेच्या सुमारास हंस ट्रॅव्हल्स कंपनीच्या ट्रॅव्हल्स क्रमांक 1) NL 07 B 0541 व 2) NL 07 B 0545 हया एका पाठोपाठ धुळेकडुन मालेगाव दिशेन येत असल्याची दिसल्याने त्यांना थांबवुन ट्रॅव्हल्स क्रमांक 1) NL07 B 0541 या वरील वाहन चालकास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव १) महोम्मद रईस गुलजार अहमद वय – ३६ वर्ष व्यवसाय – ड्रायव्हर रा. ६/१ यशवंत मार्ग, घोडा पछाड मंदीराच्या मागे महीदपुर, उज्जैन, मध्यप्रदेश व सहचालकाने त्याचे नाव २) शेख रमजान शेख शुबराती वय – ४५ व्यवसाय – क्लिनर रा. खांश्वली वार्ड, गुलशन नगर, खंडवा, मध्यप्रदेश, ३) रघुराज दुर्गा मिना वय – २९ व्यवसाय – क्लिनर रा. ग्राम महुडिया, तहसिल कन्नोज जिल्हा देवास, मध्यप्रदेश असे सांगितले.

तसेच ट्रॅव्हल्स क्रमांक 2) NL 07 0 0545 यावरील चालकाने त्याचे नाव ४) महोम्मद अशरफी अब्दुल अजीज वय – ३४ वर्ष व्यवसाय – ड्रायव्हर रा. २४९, चंदन नगर, सेक्टर जे, गल्ली नं. ७ आमवाला रोड, इंदौर, मध्यप्रदेश व सहचालकाने त्याचे नाव ५) शेख राजेश गणेश विसोदीया वय – ४५ व्यवसाय – सहचालक रा. १२३ श्रीराम नगर, पालदा, इंदौर,मध्यप्रदेश तसेच क्लिनरने त्याचे नाव ६) हरीशंकर जल्लु यादव वय – २२ व्यवसाय – क्लिनर रा. ग्राम बिरसिंगपुर, तहसिल बिरसिंगपुर, जिल्हा सतना मध्यप्रदेश असे सांगितले. नमुद दोन्ही वाहनावरील चालकांना त्यांचे ताब्यातील ट्रॅव्हल्स मधील माला बाबत विचारपूस करता, त्यांनी उडवा-उडवीचे उत्तरे दिल्याने त्यांना ट्रॅव्हल्ससह पोलीस मुख्यालय धुळे येथे आणले. सदर दोन्ही ट्रॅव्हल्सची शासकीय पंचासमक्ष तपासणी करता त्यात खालील नमुद वर्णनाचा व किमतीचा महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला पानमसाला गुटखा मिळुन आला तो, ट्रॅव्हल्स क्रमांक 1) NL07 B 0541 यामध्ये मिळुन आलेला मुद्येमाल १)५.७६,०००/- रु.कि.चा प्रिमियम राजनिवास पानमसाला २) १,४४,२००/- रु.कि.चा प्रिमियम एक्स.एल.०१ जाफरानी जर्दा ३) २,०२,५००/- रु.कि.चा राजश्री पानमसाला ४)१,८७,२००/-रु.किंचा आर.एम.डी. पानमसाला ५)८६,४००/-रु.कि.चा एम.टोबॅको तंबाखु ६) १०,०००/-रु.कि.चे दोन मोबाईल हॅन्डसेट ७) ३०,००,०००/- रु.कि.ची आयशर कपनीची ट्रॅव्हल्स
ट्रॅव्हल्स क्रमांक 1) NL 07 B 0545 यामध्ये मिळुन आलेला मुद्येमाल १) ४,०५,०००/-रु.किं.चा रितिन स्विट सुपारी (केसर फलेबर) २) ६,७२०/- रु.किं.ची आनंद मनुक्का व बमबम मनुक्का नावाच्या गोळया ३) १०,००० रू.कि.चे दोन मोबाईल हँडसेट ४) ३०, ००,०००/- रु.कि.ची अशोक लेलॅड कंपनीची ट्रॅव्हल्स असा एकूण ७६,२८,०२०/- रु.किमतीचा महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला सुगंधित पानमसाला गुटख्याची वाहतूक करताना मिळुन आल्याने त्यांचे विरुद्ध मोहाडी नगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला.

सदरची कारवाई श्री. प्रविण कुमार पाटील, पोलीस अधीक्षक धुळे,श्री. प्रशांत वच्छाव,अपर पोलीस अधीक्षक, धुळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शा.चे पो.नि.श्री. हेमंत पाटील, श्री. सतिष गोराडे,पो.उ.श्री. बाळासाहेब सूर्यवंशी, असई श्री. संजय पाटील, पोहका. श्री. संदिप सरग, पोना.पंकज खैरमोडे,पोकाॅ. मयुर पाटील, महेंद्र सपकाळ,योगेश जगताप, तुषार पारधी,किशोर पाटील, सुनिल पाटील यांनी केली.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट