महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४मतदान जनजागृतीसाठी धावले पालघरकर..!

उपसंपादक मंगेश उईके
*पालघर:-दि. १७ नोव्हेंबर रोजी मतदार लोकशाहीचा खरा आधार’, ‘व्होटकर पालघरकर’, ‘सुजाण आणि जागरूक मतदार व्हा’, ‘मी मतदान करणार आहे, तुम्हीही मतदान करा’, ‘चला आपण लोकशाही रुजवू या’, असा संदेश देत आज सकाळी पालघरकर मतदान जनजागृतीसाठी धावले. निमित्त होते महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे.






महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यातील ६ मतदारसंघात २० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या कालावधीत मतदान होणार आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी गोविंद बोडके, यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यामध्ये विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांचा एक भाग म्हणून आज सकाळी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. हुतात्मा चौक पाचबत्ती येथून मॅरेथॉनची सुरुवात झाली . तीन आणि पाच किलोमीटर अशा दोन गटात ही मॅरेथॉन होती.
जिल्हाधिकारी गोविंद बोडके, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे. पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रवींद्र हजारे, स्वीपच्या नोडल अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी विजया जाधव, या मान्यवरांच्या हस्ते स्वीपचा हिरवा झेंडा दाखवून मॅरेथॉनची सुरुवात करण्यात आली
यावेळी शासकीय अधिकारी व कर्मचारी महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते .
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com