महाराजांसाठी एकदाच काय, हजार वेळा मरायला तयार आहे’ शुर विर शिवा काशीद स्मारकास 10 लाखांचा निधी -डाॅ.अमोल कोल्हे

0
Spread the love

प्रतिनिधी-रणजित मस्के

पुणे: असं म्हणत छत्रपती शिवाजी महाराज व स्वराज्यासाठी प्राणांचे बलिदान देणारे वीर शिवा काशीद यांच्या स्मारक सुशोभीकरणासाठी माझ्या खासदार निधीतून 10 लाखांचा निधी देण्यात आला आहे.

मरण समोर दिसत असूनही छत्रपती शिवाजी महाराजांसाठी, स्वराज्यासाठी हसत हसत वीरमरण पत्करणाऱ्या शूरवीर शिवा काशीद यांची कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात समाधी आहे. या समाधी परिसराचे सुशोभीकरण करण्यासाठी निधीची अवाश्यकता असल्याचे समजले. त्यानंतर लगेचच खासदार श्री. डाॅ.अमोल कोल्हे यानी त्यांच्या खासदार निधीतून 10 लाखांचा निधी या वीर शिवा काशीद यांच्या स्मारक परिसराच्या सुशोभीकरणासाठी उपलब्ध करून दिला आहे.

या स्मारकाचे सुशोभीकरण झाल्यानंतर येथे भेट द्यायला येणाऱ्या पर्यटकांना, शिवभक्तांना व येणाऱ्या पिढीला वीर शिवा काशीद यांच्या बलिदानाची, समर्पणाची महती समजेल. स्वराज्यात छत्रपती शिवाजी महाराजांवर जीवापाड प्रेम करणारी असंख्य माणसं होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी जपलेल्या अशा असंख्य मावळ्यांच्या जीवावरच स्वराज्य उभं राहिलं. तो पराक्रमाचा, निष्ठेचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहचण्यास या स्मारकामुळे नक्कीच मदत होईल, या उद्देशाने श्री. अमोल कोल्हे यानी आपला निधी या स्मारकासाठी दिला आहे.

या निधीअंतर्गत कामाला मंजुरी देऊन सदर निधी वितरित करण्याची सूचना जिल्हा नियोजन अधिकारी, पुणे यांना दिली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट