महागडा मोबाईल फोन चोरी करणा-या एका आरोपीतास डोंबिवली पोलीसांनी अटक करुन त्याचेकडुन ७०,०००/- रुपये किमतीचा मुददेमाल हस्तगत

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

डोंबिवली: दिनांक ०७/०४/२०२३ रोजी रात्री ११.०० वा ते ११.१५ वा च्या सुमारास यातील फिर्यादी नामे श्री पदमाकर पाडुरंग चौधरी वय: ४८ वर्षे व्यवसाय:-बीअर शॉपी दुकान रा. अनुसया निवास, बँक ऑफ महाराष्ट्र च्या वर रुम नं ०५ ठाकुर्ली स्टेशन रोड, ठाकुर्ली पुर्व चोळेगाव डोंबिवली पूर्व हे त्यांच्या लव कुश बीअर शॉपी दुकाना असताना एका अनोळखी चोरटयाने बीअर घेण्यासाठी आलेल्या बहाण्याने फिर्यादीची नजर चुकवुन काउटर वर असलेला सॅमसंग एस २१ कंपनीचा एकुण ७०,००० /- रुपये किंमतीचा मोबाईल लबाडीच्या उददेशाने चोरी केला म्हणुन फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरुन डोंबिवली पोलीस ठाणे गुन्हा नोंद कः- १२८/२०२३ कलम :- ३८०भा. दं.वि प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला.

नमुद गुन्हयाच्या तपासाच्या अनुशंगाने सपोनि सानप, पोहवा ५०३ / वाघ, पोहवा १३०७ / सरनाईक, पो. अं ८४१३ / सांगळे यांनी तपासादरम्यान चोरीस गेलेला मोबाईलचा व आरोपीताचा घटनास्थळावरील सीसीटीव्हीच्या आधारे व तांत्रिक मदतीच्या आधारे शोध घेवुन त्यास एका तासात कल्याण ठाकुर्ली परीसरातुन पाठलाग करुन ताब्यात त्यास अटक करुन त्याचेकडून नमुद गुन्हयातील चोरी केलेला सॅमसंग एस-२१ कंपनीचा एकुण ७०,०००/- रुपये किंमतीचा मोबाईल हस्तगत करण्यात आला.

सदरची कामगिरी मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ -३, कल्याण श्री. सचिन गुंजाळ मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग श्री. सुनिल कुराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सचिन सांडभोर, पोनि (गुन्हे)/ तडवी, यांचे मार्गदर्शनाखाली डोंबिवली पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि योगेश सानप, पोहवा ५०३ / विशाल वाघ, पोहवा १३०७ / सरनाईक, पोअं ८४१३ / नितीन सांगळे, पो.ना. ४५७/कोती, यांनी कामगीरी केली आहे.

अटक आरोपीचे नाव व पत्ता:
विवेक कुमार श्याम बिहारी श्रीवास्तव वय 22 वर्षे, रहा.फिरस्ता, मुळगांव-गौराजू, तालुका -मंजरपुर, जि.कौसंबी, पोलीस ठाना-पश्चिम सरीरां, राज्य उत्तरप्रदेश.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट