महाड येथील बेपत्ता तरुणाचा मृतदेह सापडला सावित्री नदीच्या दादली पूलाजवळ

0
Spread the love

प्रतिनिधी- रेश्मा माने

महाड: महाड शहरातील प्रभात काॅलनी येथील रहिवासी रविंद्र चंद्रकांत शिंदे(नुर) वय 34 वर्ष या तरुणाचा मृतदेह दादली पूल येथे सावित्री नदीत सापडला असून ही आत्महत्या असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. नूर शिंदे हा गुरुवारी संध्याकाळी 6 वाजता घरात कोणालाही न सांगता बाहेर पडला होता.

त्याचे मित्र आणि नातेवाईक त्याचा शोध घेत असताना काळ मध्यरात्री मयत नूर शिंदे कडील मोटर सायकल आणि चप्पल सावित्री नदीवरील दादली पुलावर दिसून आली. त्यानंतर सावित्री नदी पात्रात मयत नूर शिंदे याचा शोध सुरु केला असता, दुसऱ्या दिवशी दुपारी साळुंखे रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी व महाड नगरपालिकेतील कर्मचारी सुमारे तीस फूट खोल पाण्यातून नूर शिंदेचा मृतदेह बाहेर काढला.

मृतदेह महाड शहर पोलिसांनी ताब्यात घेवुन शवविच्छेदना नंतर मृतदेह घरच्यांच्या ताब्यात देण्यात आला या प्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार श्री. राजु पवार अधिक तपास करीत आहेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

dipakbhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट