महाड वरंध घाटात महाड रामदास पठार एस.टी. दरीत पलटी झाल्याने १७ प्रवाशी गंभीर जखमी..!

उप संपादक- राकेश देशमुख
महाड :
शनिवार दिनांक १५ मार्च २०२५ रोजी संध्याकाळी ४ ; ४८ दरम्यान वरंध घाटात महाड रामदास पठार एस.टी. चा अपघात होऊन एस.टी.पलटी होऊन कोणतीही जीवित हानी झाली नाही परंतू या भीषण अपघातात एकुण १७ प्रवासी गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना महाड सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.



यामध्ये सुभद्रा धनावडे, हनुमंत दिघे माझेरी चालक , राजेश साळुंखे- शिरगाव, काशिबाई जाधव व ज्ञानदेव जाधव -रामदास पठार, सुनिता चौधरी – वडघर , साईज्ञा मालुसरे , आशा मालुसरे , रघुनाथ मालुसरे , मंदा पवार, कांचना मालुसरे – पारमाची, दगडाबाई पांडे , तुळशीबाई यादव ,निलीमा पोळ , अथर्व पोळ – तळीये आणि सुवर्णा धनावडे, सुप्रिया धनावडे- वरंध याना गंभीर दुखापत झाल्यामुळे महाड सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे