महाड तालुक्यात खासदार सुनील तटकरे यांना हादरा-संपूर्ण सवाणे गावाचा बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश…!

प्रतिनिधी-रेश्मा माने
महाड: शिवसेना उपनेते आणि पक्ष प्रतोद आमदार भरतशेठ गोगावले यांच्या नेत्रत्वाखाली केला जाहिर प्रवेश
सवाणे गाव पुन्हा एकदा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणार…..
सवाणे गावच्या रस्त्याच्या उद्धघाटनाला मंत्री म्हणूनच येणार आमदार भरतशेठ गोगावले
काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये काम करत असताना आमचा कोणताही विकास झाला नाही: विशाल भालेकर
येणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत सवाणे ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकलेला असेल…. भालेकर
महाड विधानसभा क्षेत्रात आमदार भरतशेठ गोगावले यांचा पक्ष प्रेवशाचा झंजावात वाढला असून आमदार भरतशेट गोगावले यांच्या विकास कामांच्या धडाक्यावर विश्वास ठेवून पक्ष प्रवेश करणार्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे आज महाड तालुक्यातील सवाणे ग्रामपंचायत मधिल सवाणे गावातील जवळपास शंभर महिला व पुरुष कार्यकत्यांनी आमदार भरतशेट गोगावले यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाला दणका देत आमदार भरतशेट गोगावले यांच्या हस्ते बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे.

यावेळी मा जिल्हा परिषद सदस्य संजय कचरे ,माजी सरपंच अनिल उत्तेकर, उद्योजक संजय शिंदे, रुपेश तटकरे,रमाकांत भिसे,सुधाकर सावंत इत्यादी मान्यवर आणि गावातील प्रतिष्ठित नागरिकतसेच विभागातील शिवसेना युवासेनेचे आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

यावेळी बोलत असताना आमदार गोगावले यांनी सवाणे गाव तसा आमचा बालेकिल्ला होता मात्र मध्यंतरीच्या काळात आपण काही मंडळी प्रथम काँग्रेस पक्षात आणि नंतरच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेलात मात्र आपल्या गावचा विकास हा माझ्याच माध्यमातून होणार होता म्हणून आज आपण सर्वांनी पुन्हा एकदा बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षात प्रवेश घेतला आहात आणि जरी आपण नसता आलात तरीही मी या गावचा विकास हा करणारच होतो पण आता आपण प्रवेश केला आहात आपला सर्वांगीण विकास करणार आणी आपल्या गावच्या रस्त्याच्या उद्दघाटणाला मंत्री बनूनच येणार असा विश्वास आमदार गोगावले यांनी प्रवेश कर्त्याना दिला आहे
तर यावेळी बोलत असताना प्रवेश करते विशाल भालेकर यांनी सांगितले कि प्रथम आम्ही काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला मात्र या दोन्ही पक्षांच्या माध्यमातून आमचा विकास झाला नाही म्हणून आम्ही पुन्हा एकदा कार्यसम्राट आमदार गोगावले यांच्या विकास कामांचा धडाका पाहूण बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश करत असून येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणूकीत सवाणे ग्रामपंचायतीवर भगावा हा फडकवणारच असा ठाम विश्वास दर्शविला आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com