महाड एसटी डेपोची अवस्था जैसे थे.. ना काही बदल ना नवीन कामाला सुरुवात…!

प्रतिनिधी- अभिजित माने
महाड : मुंबई प्रांत संयुक्त महाराष्ट्रात आल्यावर संपूर्ण महाराष्ट्रात अनेक बदल होऊ लागले आणि महाराष्ट्रातील गावा गावांमधे जायचे एकमेव साधन म्हणून प्रवाशी साधन निर्माण झाले ते म्हणजे गरिबांची लालपरी आपली एस.टी… त्याकाळी गाडी असणे म्हणजे श्रीमंतीचे प्रतिक असे. म्हणून एस.टी सेवेला तेव्हा सुगीचे दिवस आले आणि हाहा म्हणता एस.टी लोकांच्या मनातील ताईत बनून गेली. म्हणून शासनाने अनेक प्रकारे सुविधा निर्माण करत प्रत्येक महाराष्ट्रातील तालुक्यातील शहरात एस.टी डेपो निर्माण केले.

गेली साठ वर्षे एस.टी महामंडळाची ही लालपरी आपले लोकांच्या मनामधे स्थान कायम टिकवून आहे. कारण खाजगी वाहनांपेक्षा कमी भाडे आणि सुरक्षित प्रवास हेच उद्दिष्ट जनतेला आवडले म्हणून आजही लोकांची पहिली पसंती ही आपल्या लालपरीला आहे. आतापर्यंत गाड्यांमध्ये अनेक प्रयोग केले आहेत ते यशस्वी पण होत आहे.

महाड एस.टी डेपो त्यातील एक महत्त्वाचा डेपो. मुंबई पुणे ते तळ कोकणातील सर्व जाणार्या येणार्या प्रवाशी गाड्यांचे महत्वाचे मध्यवर्ती ठिकाण कारण विश्रांती आणि गाड्यांची देखभाल डागडुजी साठी पेण नन्तर मोठा डेपो हे महाडचे वैशिष्टय़ आहे. यासाठी महाड डेपोला सुरवातीपासूनच विशेष महत्त्व आहे.

तेव्हा महाड डेपोत अनेक दुकाने,उपहारगृह, विश्रांतगृह व अनेक छोटे मोठे विक्रेत्याची स्टॉल होते. महाड डेपो म्हणजे एक मोठे प्रवासांच्या सोईचे ठिकाण होते. पण हळू हळू या प्रवाशी सेवेला ग्रहण लागले आणि दिवसेंदिवस डेपो मध्ये एक एक दुकान उपहारगृह बंद होत गेले. काही चुकीची सरकारी आणि महामंडळाची धोरणे याला अपवाद होती. दिवसेंदिवस सरकारने जाहीर केलेला नफा तोटा यामुळे योग्य धोरण नसल्याने एस.टी महामंडळ तोट्यात जाऊ लागले व महाड डेपो शेवटच्या घटका मोजू लागला. अनेक अंतर्गत प्रवाशी फेर्या रद्द होऊ लागल्या त्याचा फायदा मिनीडोअर रिक्षा चालणाऱ्या लोकांना झाला. पण एसटी महामंडळाने कधीही या खाजगी सेवेला शह देण्यासाठी पाऊल उचलले नाही.

कालांतराने शासनाने थोडा बाजू मजबूत करण्याचा प्रयत्न केला पण तो तोडका ठरला. जुन्या जागेवरील डेपो नवीन अत्याधुनिक डेपोत करण्यासाठी डेपो समोर आराखडा बनवून काम सुरू झाले आणि जनतेला खुप आनंद झाला. आता आपल्याला स्वच्छ असा डेपो आणि मूलभूत सुविधा मिळतील म्हणुन महाड तालुक्यातील सर्व जनता खुश होती. पण हा आनंद काही काळापुरता टिकला. जगावर आलेले कोरोना संकट त्यात दोन वर्षे काम बंद झाले नंतर एस.टी कर्मचारी संप झाला आणि अशीच तीन वर्षे निघून गेली. नवीन डेपोचे बांधकाम असेच अर्धवट पडून आहे , का थांबलेय याचे उत्तर अजूनही माहीत नाही.

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून आत डेपो मध्ये जायला खडी मातीचा रस्ता आहे तो अंतर्गत वादामुळे कोणी बनवत नाही किंवा शासन अनास्था असू शकते. आतापर्यंत अनेक अपघात आणि लोकांची हाडे मोडली आहेत. ही गोष्ट बाजूला ठेवू पण आता जो जुना डेपो आहे त्यामधे अजूनही जे वर्षोनुवर्षे महाड कोकणातील प्रवाशी अनुभवतो आहे तेच भोग त्याच्या नशिबी आहेत.
सगळीकडे पडलेली घाण, दुर्गंधीने भरलेले स्वच्छता गृह, रात्री चाऊन खाणारे मच्छर आणी दोन स्टॉल वगळता काहीच सुविद्या नसलेले बंद पडलेले उपहारगृह या खेरीज काहीच सुविधा महाड डेपोत होतच नाहीत. नवीन डेपो होईल तेव्हा होईल पण निदान स्वच्छता गृह मुतारी, शौचालय तरी सुधारा…. हीच जनतेची मागणी आता जोर धरू लागली आहे .
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com