महाड एसटी आगाराच्या बसेस नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले….

प्रतिनिधी :-सचिन पवार
माणगांव रायगड
माणगांव :-एसटी महामंडळाची सेवा जुन्या बसमुळे ठरतेय त्रासदायक.प्रवासात बस बंद पडण्याचे प्रकार वाढले; प्रवाशांचे हाल.बस सेवा प्रवाशांच्या सेवेसाठी की मनस्तापासाठी?रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ ची पोलादपूर बोरिवली एसटी बस पोलादपूर येथून सकाळी सुटली महाड माणगाव येथे प्रवासी घेत इंदापूर येथील स्थानकात चहा नाश्ता करायला थांबली.चहा नाश्ता करून झाल्यावर बस सुटण्याच्या वेळी बसचा फुगा फुटला आहे असे सांगून सर्व साठ प्रवासी दुसऱ्या गाड्यांमध्ये बसविण्याचा प्रयत्न चालक व वाहक यांनी केला.”प्रवाशांच्या सेवेसाठी” हे ब्रीद वाक्य असले, तरी सध्याच्या अनेक एसटी बसप्रवाशांना सेवा देण्यास महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ कमी पडत असल्याचे रोजचे चित्र आहे.


प्रवाशांचा वेळ खर्ची होत असल्याचे दिसून येत आहे. याकडे महामंडळ लक्ष देणार आहे का? असा सवाल संतप्त प्रवाशांमधून व्यक्त केला जात आहे.जाणकारांच्या मतानुसार १० लाख किलोमीटर किंवा १० वर्षे असे निकष असताना अनेक एसटी बस १५ लाख किलोमीटरपेक्षा जास्त धावल्या आहेत. तसेच, १५ वर्षांहून अधिक जुन्या अगदी खिळखिळ्या झालेल्या बस अजूनही रस्त्यावर धावत आहेत. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर या बस बंद पडण्याचे प्रमाण वाढत आहे.स्टेअरिंगमध्ये बिघाड होणे, गिअर अडकणे, रेडिएटर फुटणे, इंजिन ओव्हर हीट होणे, टायर फुटणे, स्टार्टरमध्ये बिघाड झाल्याने बसला धक्का मारण्याची वेळ येणे, फॅन बेल्ट तुटणे आदी प्रकार नेहमीचेच झाले आहेत.तर, अंतर्गत भागातही बसचे सीट तुटलेले, गाद्या फाटलेल्या असणे, खिडक्या फुटणे किंवा नसणे, पत्रा तुटलेला असणे तसेच बसचा आवाजही प्रवाशाच्या कानाला सहन होणार नाही इतका असणे, अशा समस्या जुन्या बसमध्ये असतात.अनेकदा लांब पल्ल्यासाठी याच जुन्या बस वापरल्या जात आहेत. त्याचा प्रवाशांना नाहक त्रास सोसावा लागत आहे.वाहक व चालक यांनी अर्धा पाऊण तास गाड्या थांबविण्यासाठी प्रयत्न केले.
सोमवार असल्याने सर्वच एसटी बस प्रवाशांनी तुडुंब भरून येत होत्या म्हणून एक दोन प्रवासी मार्गस्थ होऊ लागले.चालक व वाहक यांनी दुसरी बस मागविण्या ऐवजी प्रवाशांना दमदाटी करून इंदापूर येथील बस स्थानकाच्या वाहतूक नियंत्रक महिलेला सांगून बस मागवायला सांगा असे सांगून प्रवाशांना तिकडे पाठविले.महिला वाहतूक नियंत्रक भडकल्या आणि त्यांनी प्रवाशांना चालक व वाहक यांना बोलावून घेण्यास सांगितले.वाहक व वाहतूक नियंत्रक महिलेची खडाजंगी झाली.
प्रवाशांची गैरसोय संतापजनक झाली असल्याने प्रवासी खासगी, मिळेल त्या वाहनाने आप आपल्या कामाच्या ठिकाणी जाऊ लागले.काहींना चालक व वाहक यांनी एसटी बसमध्ये बसवून दिले.एका महिलेला तिच्या चार वर्षे वयाच्या मुलीचेही तिकिट घ्यायला वाहकाने भाग पाडले होते.त्या महिलेला मुलीसह दुसऱ्या एसटी बसमध्ये उभे राहून प्रवास करावा लागणार असल्याने तीदेखील संतापली होती.महाड एसटी डेपोच्या लांब पल्ल्याच्या गाड्या नादुरुस्त होण्याचे प्रमाण जास्त असून प्रवाशांना होणाऱ्या मनस्तापाचे महामंडळाच्या कर्मचारी वर्गाला काहीच सोयरसुतक नसते हे प्रत्येक वेळी दिसून आले आहे.