महाड महापुरातील नुकसानग्रस्त लाभार्थींना 14 कोटी 99 लाख 47 हजार 926 रुपयांचे वाटप…!

प्रतिनिधी-किशोर कीर्वे
शिल्लक राहिलेल्या लाभार्थ्यांनी नमूद पूरावे महाड तहसील कार्यालयामध्ये दि.१५/१/२०२२ पर्यंत जमा न केल्यास शासनप्राप्त अनुदान शासनजमा करण्यात येईल!

दि.२२ व २३ जुलै रोजी महाड तालुक्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुरामध्ये मोठ्या प्रमाणात जिवित व वित्तहानी झाली होती त्या अनुषंगाने झालेल्या नुकसानीमधील महाड शहर व ग्रामीण भागातील दुकानदार,टपरीधारक, हातगाडीधारक यांना अनुदानाचे वितरण करण्यात आले असून ते पुढीलप्रमाणे!
१) दुकानांच्या पंचनाम्यानुसार लाभार्थी संख्या-३ हजार ९६२ असून वाटप लाभार्थी संख्या-३ हजार ९३ असून त्यांना १४ कोटी ८४ लाख ३१ हजार ८५१ रुपये चे अनुदानाचे वितरण करण्यात आले आहे तर ८६९ लाभार्थी शिल्लक आहेत!
२) टपरीधारक पंचनाम्यानुसार लाभार्थी संख्या-३०४ असून वाटप लाभार्थी संख्या-५१ असून त्यांना ३ लाख ७७ हजार २५० रुपये चे अनुदान वाटप करण्यात आले आहे तर २५३ लाभार्थी शिल्लक आहेत!
३)हातगाडीधारक पंचनाम्यानुसार लाभार्थी संख्या- १८० असून वाटप लाभार्थी संख्या- १२६ असून त्यांना ११ लाख ३८ हजार ८२५ रुपये चे अनुदान वाटप करण्यात आले तर शिल्लक लाभार्थी संख्या- ५४ आहे!
असे एकूण पंचनाम्यानुसार लाभार्थी संख्या- ४ हजार ४४६ असून वाटप लाभार्थी संख्या- ३ हजार २७० असून त्यांना १४ कोटी ९९ लाख ४७ हजार ९२६ रुपये चे अनुदान वाटप करण्यात आले आहे तर १ हजार १७६ लाभार्थी शिल्लक आहेत!
दि.११ ऑगस्ट व दि. १७ नोव्हेंबर २०२१ च्या शासन निर्णयामध्ये नमूद कोणतेही पूरावे कार्यालयात जमा न केल्यामुळे उर्वरित अनुदान वाटप करण्याचे प्रलंबित आहे!
सदरील दुकानदार, हातगाडीधारक, टपरीधारक, अनुदान वाटपास शिल्लक लाभार्थी यांची यादी महाड तहसील कार्यालय,नगर परिषद,पंचायत समिती,ग्रामपंचायत येथे नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे!
नोंदणीकृत परवानाधारक नसल्यास स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत स्थानिक कर,दैनंदिन कर,भू-भाडे भरत असल्याबाबतचा दाखला,तहसील कार्यालयात जमा करावा असे स्थानिक प्रशासनाने कळविले आहे!
अनुदान वाटप शिल्लक लाभार्थी-दुकानदार, हातगाडीधारक, टपरीधारक,या लाभार्थ्यांनी नमूद तहसील कार्यालयामध्ये दि.१५ जानेवारी २०२२ पर्यंत विहित मुदतीत जमा न केल्यास शासनप्राप्त अनुदान शासनजमा करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे तहसीलदार महाड सुरेश काशिद यांनी कळविले आहे!!!
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
dipakbhogal@surakshapolicetimes.com