महाड मध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला दे धक्का…!

0
Spread the love

प्रतिनिधी- रेश्मा माने

अंबेनळी: महाड अंबेनळी गावाने घेतला शिवसेना आमदार भरतशेट गोगावले यांच्या उपसस्थित शिवसेनेत प्रवेश

तर देशमुख कांबळे गावातील काँग्रेस कार्यकर्ते झाले शिवसेना पक्षात दाखल

गावच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार गोगावले यांच्यावर विश्वास ठेवत केला प्रवेश

महाड मध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला दे धक्का…!
महाड मध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला दे धक्का…!

काही दिवसांच्या अंतरावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आल्या आहेत त्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती असो कींवा ग्रामपंचायत निवडणुका ह्या उंबरठ्यावर येऊन ठेपल्या आहेत आणि याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षात प्रवेश घेणार्यांची संख्या देखील वाढत आहे काल देशमूख कांबळे गावातील काँग्रेस युवक कार्यकर्ते मनिष रविंद्र कळमकर, शुभम राजेंद्र पवार, आत्माराम कळमक, आणिता अ.कळमकर, सुमेध साळवी, पुजा मानिष कळमकर, कुंदा रविंदर कळमकर, रामदास साळवी, विश्वास देशमूख, स्वप्नील पदमाकर देशमुख, पद्माकर गोविंद देशमूख, कल्पना रामदास साळी यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला .

तर तालुक्यात अतिशय दुर्गम असणारे अंबेनळीच्या संपूर्ण गावाने आपल्या गावच्या सर्वांगीन विकासाठी महाड पोलादपूर माणगावचे कार्यसम्राट लोकप्रिय आमदार भरतशेट गोगावले यांच्या विकास कामाची घौडदौड पाहता संपुर्ण गावाने आमदर साहेब यांच्या उपस्थितीत आमदार निवास शिवनेरी येथे शिवसेना पक्षात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत शिवसेना पक्षात जाहिर प्रवेश केला आहे .

आंबेनळी येथिल वसंत बाबूराव जगताप, बाळू जाधव, दत्ताराम बाबू सकपाळ, अशोक संभाजी जगताप, राम संभाजी जगताप, सखाराम बाबू सकपाळ, लकी किसन कदम , कळा श्रीपत जाधव, हौसाबाई किसन सकपाळ, नंदा विष्णू सकपाळ, रोहित राजू सकपाळ, शुशिला भाऊ सकपाळ, वेणूबाई गंगाराम जाधव,नारायण संभाजी जगताप सह संपूर्ण अंबेनळी ग्रामस्थानी आज आमदार गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहिर प्रवेश केला.

यावेळी महाड पोलादपूर माणगावचे कार्यसम्राट आमदार भरतशेट गोगावले वरंध जिल्हा परिषद सदस्य मनोज काळीजकर, वरंध विभाग प्रमुख लक्ष्मण भोसळे, वरंध विभाग युवासेना अधिकारी संजय गुरव , संदिप झांजे, विजय साळूंके, संतोष जगताप , तुकाराम जाधव इत्यादी ग्रामस्थ त्याचप्रमाणे शिवसेना युवासेना पदाधिकरी कार्यकर्ते उपस्थित होते

यावेळी बोलताना आमदर गोगावले यांनी आंबेनळी गावाच्या विकास कामांपासून वंचित राहण्यामागचे कारण तुम्हीच आहात तुम्ही सर्वजण एकत्र एकजुटीने असता तर आत्तापर्यंत विकासापासून वंचित राहिला नसता कारण तुम्ही ज्या पक्षात होता त्या पक्षाने तुमची निराशाच केली, तुमची कोणतीही विकास कामे केली नाही आतापर्यंत जी विकास कामे झालीत ती शिवसेनेच्याच माध्यमातून झालेली आहेत उशिरा का होईना आपणास शहाणपण सुचले आणि आपण शिवसेना पक्षात प्रवेश केला आता तुमच्या विकास कामांची जबाबदारी आमची आहे असे आमदार गोगावले यांनी प्रवेश कर्त्याना सांगितले असून अंबेनळी गावच्या विकासाची हमी आता आम्ही घेतली आहे असे त्यानी सांगितले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

dipakbhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट