महाड शहरात कलकाम रियल इन्फ्रा इंडिया लिमिटेड एका बोगस कंपनीची अडीच कोटी रुपयाला ग्राहकांची फसवणूक…
प्रतिनिधी-रेश्मा माने
महाड: महाड शहर पोलीस ठाण्यात तिघां विरोधात गुन्हा दाखल

देशामध्ये व राज्यामध्ये अनेक प्रकारच्या बोगस कंपन्या स्थापन करून ग्राहकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केली जात आहे. तसाच काहीसा प्रकार महाड शहरांमध्ये देखील घडला आहे. महाड शहरामध्ये शिवाजी चौक, अंबिका कॉम्प्लेक्स येथे कलकाम रियल इन्फ्रा इंडिया लिमिटेड कंपनीची शाखा चालू करण्यात आली होती. एजंट व ग्राहकांना आपल्या कंपनीमध्ये गुंतवणूक करून नफा कसा मिळतो याचे अमिष दाखवून सुमारे दोन कोटी 97 लाख दहा हजार पाचशे पंधरा रुपयाचा ग्राहकाला गंडा घातला आहे. त्यापैकी गुंतवणुकीतील 41 लाख 66 हजार 930 रुपये ग्राहकाला परत करून सुमारे दोन कोटी 55 लाख 43 हजार 585 रुपये ग्राहकाची फसवणूक केली आहे. संजय गणपत वांद्रे राहणार पायरीकोंड, पोस्ट खर्डी, तालुका महाड यांनी महाड शहर पोलीस ठाण्यात तिघां विरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये आरोपी विष्णू पांडुरंग दळवी रा.डोडामार्ग जिल्हा सिंधुदुर्ग, विजय चंद्रकांत सुपेकर सध्या रा. वसई… मूळ राहणार पायरीकोंड खर्डी, तालुका महाड, व सुनील रघुनाथ वार्दे रा. नालासोपारा मूळ रा. पायरीकोंड खर्डी तालुका महाड… अशी आरोपींची नावे असून त्यांच्याविरुद्ध भादविस कलम 420, 406, 409, 34 सह महाराष्ट्र ठेवीदारांचे हित रक्षणाचा कायदा कलम 1999 चे 3,4 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग कापडेकर हे करीत आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com