अष्टविनायक महड तीर्थशेत्र येथे माघी गणेशोत्सव व पालखी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न….
संपादिका – दिप्ती भोगल
खालापूर:– वरदविनायक अष्टविनायक क्षेत्र महड खालापूर येथे गणेश जन्म माघी महोत्सवा निमित्ताने या वर्षी धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
नवसाला पावणारा व हाकेला धावणारा वरदविनायक प्रसिद्ध गणपती असून भाविक भक्तगण मोठया प्रमाणात मंदिरात दर्शनासाठी येत असतात.
गणेश जन्मोत्सवानिमित्ताने गेली ६ दिवस सामाजिक व अध्यात्मिक स्वरूपाचे कार्यक्रम करण्यात आले.
त्याच बरोबर काल रात्री संपुर्ण महड गावातून पालखी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
त्याचबरोबर महिलांसाठी खेळपैठणीचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तसेच मंदिरात सुंदर रांगोळी साकारण्यात आली होती.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com