मध्य प्रदेश, गुजरातमधून मोटारसायकल चोरणाऱ्याला अटकनंदुरबार गुन्हे शाखेने जप्त केल्या १९ मोटारसायकल…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

नंदुरबार :– मध्य प्रदेश, गुजरात राज्यातून मोटारसायकल चोरणाऱ्याला अटक करण्यात आली. ही कारवाई नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. या कारवाईत १० लाख २६ हजार रुपयांच्या १९ मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत.



म्हसावद पोलीस ठाणे हद्दीतील राणीपुरयेथील रहिवासी बळीराम कालुसिंग परडके यांची हिरो कंपनीची मोटारसायकल चोरीला गेल्या प्रकरणी म्हसावद पोलिसांनी ( गु.र.नं. 222/2022 भा.द.वि. कलम 379) गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला. तपासादरम्यान गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांना गुप्त बातमी मिळाली की, धडगाव शहरातील मेन बाजारात एक इसम विना क्रमांकाची महागडी मटारसायकल विक्री करित आहे.

अशी माहिती मिळाल्यावरून पोलीस निरीक्षक खेडकर यांनी लागलीच एक पथक तयार करून मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी रवाना केले. स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने मिळालेले बातमीचे अनुषंगाने धडगाव शहरातील मेन बाजार परिसरात जाऊन खात्री केली असता, एक इसाम् विना क्रमांकाचे दुचाकी वाहनासह मिळून आला. त्याची चौकशी केली असता त्याने स्वत:चे नाव भरत विरसिंग पावरा (वय 27 रा.हरण्यूरी ता.धडगाव जि. नंदुरबार) असे सांगितले. त्याचे ताब्यात मिळून आलेल्या मोटारसायकलचे कागदपत्रांबाबत विचारपूस करता तो उडवा उडवीची उत्तरे देऊ लागला. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने सदरची मोटारसायकल मध्यप्रदेश येथून चोरी करुन आणल्याचे सांगितले.

तसेच अधिकची विचारपूस करता त्याने मागील काही दिवसांमध्ये गुजरात व मध्यप्रदेश राज्यातूनही महागड्या मोटारसायकली चोरलेल्या असून त्या त्याचे राहत्या गावाचे बाहेर जंगलात लपवून ठेवल्याची सविस्तर माहिती दिली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने सदर इसमभरत पावरा यास ताब्यात घेतले व जंगल परिसरातून मोटारसायकली जप्त केल्या आहेत. या कारवाईत १० लाख २६ हजार रुपयांच्या १९ मेटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

ही कारवाई नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, हवालदार साजन वाघ, मुकेश तावडे, मनोज नाईक, बापू बागुल, सुनील पाडवी, राकेश मोरे, अविाश चव्हाण, मोहन ढमढेरे, अभिमन्यु गावीत, दिपक न्हावी, शोएब शेख, अभय राजपुत यांनी केली.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट