मा. न्यायालयाच्या आवारामध्ये अवैध धारधार तलवार, कोयता, लोखंडी कु-हाड बाळगणा-या रेकॉर्डवरील आरोपीसह एकास घेतले ताब्यात स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात..

सह संपादक- रणजित मस्के
जालना


जालना जिल्हयात अवैध धारधार शस्त्रे तलवार बाळगणारे इसमांची माहिती घेऊन कारवाई करणे बाबत मा.पोलीस अधिक्षक श्री. अजय कुमार बन्सल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री पंकज जाधव व पथकास सूचना दिल्या होत्या.त्यावरुन श्री. पंकज जाधव, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा जालना यांना त्यांचे गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली होती की, रेकॉर्ड वरील आरोपी नामे श्रीकांत उर्फ शिरया ऋषीकुमार ताडेपकर वय 35 वर्ष रा. सरस्वती मंदीर जवळ, खरपुडी रोड जालना हा त्याचे साथीदार नामे सागर शांतीलाल रेड्डी वय 33 वर्ष रा. कानडी बस्ती, रामनगर जालना याचे सह मा. न्यायालयाच्या आवारामध्ये काही घात पात करण्याच्या उद्देशाने विनापरवाना बेकायदेशीर रित्या धारधार तलवार, लोखंडी दांडा असलेली कु-हाड, व कोयता स्वतःच्या ताब्यात व कब्ल्यात बाळगत आहे अशी खात्रीलायत बातमी मिळाले वरुन स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक तयार करुन त्यांना सदर आरोपीतांना ताब्यात घेणे बाबत सुचना दिल्या होत्या.त्याअनुषंगाने सदर आरोपीतांचा मा. न्यायालयाच्या आवारा मध्ये शोध घेत असतांना सदर आरोपी हे जिल्हा परिषद जालना मधील कॅन्टीन जवळ मिळून आल्याने त्यांचे कडुन 4000 रु किंमतीची धारधार तलवार, लोखंडी दांडा असलेली कु-हाड, व कोयता जप्त करण्यात आले आहे. नमुद आरोपीतां विरुद्ध पोलीस ठाणे तालुका जालना येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई ही मा.पोलीस अधीक्षक श्री. अजयकुमार बंसल, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी, उप विभागीय पोलीस अधिकारी जालना श्री. अनंत कुलकर्णी, उप विभागीय पोलीस अधिकारी जालना यांचे मार्गदर्शनाखाली श्री. पंकज जाधव, पोलीस निरीक्षक स्थागुशा जालना, श्री. योगेश उबाळे, सहायक पोलीस निरीक्षक, श्री.राजेंद्र वाघ, पोलीस उप निरीक्षक, व पोलीस अंमलदार गोपाल गोशिक, रमेश राठोड, भाऊराव गायके, ईरशाद पटेल, सतिष श्रीवास, आकुर धांडगे, रमेश काळे, सर्व ने. स्थागुशा जालना यांनी केली आहे.