मा. सुनील फुलारी, विशेष पोलीस महानिरिक्षक, कोल्हापुर परिक्षेत्र यांचे हस्ते सांगली पोलीस कल्याण अंतर्गत असले कृष्णा मॅरेज हॉल व बालवाडी नुतनीकरण उद्घाटन…

सह संपादक- रणजित मस्के
सांगली :- सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कल्याण अंतर्गत असलेल्या कृष्णा मेरेज हॉल व बालवाडीचे नुतनीकरण करण्यात आले. सांगली जिल्ह्याचे वार्षिक निरीक्षणाचे वेळी कृष्णा मॅरेज हॉल व बालवाडी नुतनीकरणाचे उद्घाटन आज दि. २१/०२/२०२५ रोजी मा. सुनिल फुलारी, (भा.पो.से) विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापुर परिक्षेत्र, कोल्हापुर व श्रीमती वंदना सुनिल फुलारी यांचे शुभ हस्ते व संदीप घुगे पोलीस अधीक्षक, सांगली तसेच श्रीमती शितल संदीप
घुगे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
यावेळी श्रीमती रितु खोकर, (भा.पो.से) अपर पोलीस अधीक्षक, सांगली, श्रीमती विमला एम. (भा.पो.से) उपविभागीय पोलीस अधिकारी, शहर विभाग, सांगली, दादासाहेब चुडाप्पा, पोलीस उप-
अधीक्षक, (मुख्यालय), सांगली तसेच सर्व शाखेचे प्रभारी अधिकारी हजर होते.





सदर उद्घाटन समारंभाचे वेळेस श्री. सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापुर परिक्षेत्र, कोल्हापुर यांनी कृष्णा मेरेज हॉलच्या नुतनीकरणामुळे पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच इतर सामान्य नागरिकांना सदर हॉलचा वेगवेगळे समारंभ तसेच इतर शासकीय कार्यक्रम चांगल्या रितीने घेण्याकरीता उपयोग होईल असे सांगितले. उद्घाटनाच्या वेळेस श्री. संदीप घुगे, पोलीस अधीक्षक, सांगली यांनी सदरचा कृष्णा मेरेज हॉल हा भविष्यामध्ये मल्टिपर्पज हॉल सारखा नावारुपास येईल यासाठी नेहमी प्रयत्नशील राहू असे आश्वासन दिले.
सांगली जिल्हा पोलीस कल्याण अंतर्गत असलेल्या बालवाडीच्या नुतनीकरण उद्घाटनाच्या अनुशंगाने बालवाडीत असलेल्या चिमुकल्यांशी श्री. सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापुर परिक्षेत्र, कोल्हापुर यांनी संवाद साधुन बालवाडीही हसत खेळत शिक्षणाची सुरवात असते, बालकावर चांगले संस्कार झाले तर तो भविष्यात उत्कृष्ठ नागरिक होण्यासाठी मदत होते. या उक्तीप्रमाणेच सदर बालवाडीमध्ये येणा-या बालकांवर उत्कृष्ठ दर्जाचे संस्कार करण्याची जबाबदारी ही आपलीच राहील. तसेच या बालवाडी मधुन उद्याचे चांगले संस्कारमय विद्यार्थी बाहेर पडतील अशा आशा व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. श्री. संदीप घुगे, पोलीस अधीक्षक, सांगली यांनी बालवाडीस लागणा-या इतर सोयी सुविधा तसेच लागणारे साहित्य पुरविण्यात येईल याची ग्वाही दिली. या वेळेस श्रीमती वंदना सुनिल फुलारी मॅडम व श्रीमती शितल संदीप घुगे मॅडम यांनी बालवाडी मधील चिमुकल्यांना खाऊचे वाटप करीत शुभेच्छा दिल्या.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com