मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-०३ कार्यक्षेत्रातील सराईत आरोपीवर तडीपार अंतर्गत कारवाई

सह संपादक- रणजित मस्के
पुणे
पोलीस उप आयुक्त परिमंडळ-०३ कार्यक्षेत्रातील पोलीस स्टेशन अभिलेखावरील खुनाचा प्रयत्न, मारहाण करणे. शिवीगाळ करुन धमकावणे, गंभीर दुखापत करणे, मालमत्तेचे नुकसान करणे, बेकायदेशिर जमाव जमविणे, त्यास चेतावणी देणे, जाळपोळ करणे, दहशत निर्माण करणे, दंगा करणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल असलेले रेकॉर्डवरील क्रियाशील गुन्हेगारावर कायद्याचा दबाव रहावा यासाठी सबंधीत पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी पाठविलेल्या तडीपार प्रस्तावावरुन पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-०३ पुणे शहर यांनी प्रस्तावाची चौकशी पूर्ण करुन महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ व ५६ (१) (अ) (ब) अन्वये पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आयुक्तालय व पुणे जिल्ह्यातुन ०६ महिने ते ०२ वर्षापर्यंत तडीपार आदेश करण्यात आले आहेत.
तडीपार करण्यात आलेल्या आरोपींमध्ये कोथरूड पोलीस स्टेशन अभिलेखावरील आरोपी १) ओंकार उर्फ आवा शंकर कुडले, वय २९ वर्षे, रा. चाळ नं ०७, न्यु लक्ष्मीनगर, शास्त्रीनगर, कोथरुड, पुणे २) प्रसाद उर्फ मुन्ना भगवान मोरे वय २० वर्षे रा. भुमकर चाळ, दुसरा मजला, कोथरुड, पुणे यास महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ (१) (अ) (ब) अन्वये ०६ महिन्याकरीता, नांदेड सिटी पोलीस स्टेशन अभिलेखावरील गुन्हेगार १) महेश सतिश रोंगे, वय १९ वर्षे, रा- मल्हार बिल्डींग फ्लॅट नं ३०१, चांदणी चौक, धायरी गांव, पुणे यास महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६(१) (अ) (ब) अन्वये ०२ (दोन) वर्षाकरीता तसेच उत्तमनगर पोलीस स्टेशन अभिलेखावरील गुन्हेगार १) अभिजीत भिमाशंकर देशमाने, वय २४ वर्षे, रा. अनमोल रेसिडेन्सी संस्कृती हॉटेलच्या मागे, देशमुखवाडी, शिवणे पुणे २) राहुल गणपत जांभुळकर, वय २७ वर्षे, रा. फ्लॅट नं ३०१, पंत रेसिडेन्सी, शिवणे, देशमुखवाडी, पुणे यांना महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये ०६ (सहा) महिन्याकरीता असे एकुण ०४ तडीपार आदेशान्वये ०५ गुन्हेगारांना पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आयुक्तालय व पुणे जिल्हातुन तडीपार करण्यात आले आहे.
सदर कारवाई ना. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री प्रविणकुनार पाटील, यांचे मार्गदर्शनाखाली मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-०३ श्री. संभाजी कदम यांचे कडुन करण्यात आलेली आहे. या पुढील काळात देखील पोलीस उप आयुक्त परिमंडळ-०३ हडितील रेकॉर्डवरील क्रियाशील गुन्हेगारांवर अशाच प्रकारची ठोस प्रतिबंधक कारवाई करुन गुन्हेगारास प्रतिबंध करणेकामी भर देण्यात येणार आहे.