मा. ना. श्री. चंद्रकांत (दादा) पाटील, पालकमंत्री, सांगली यांनी घेतला सांगली जिल्हा पोलीस दलाच्या कामगिरीचा आढावा

सह संपादक- रणजित मस्के
सांगली :
मा. ना. श्री. चंद्रकांत (दादा) पाटील, मंत्री, उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्य तथा पालकमंत्री, सांगली जिल्हा यांनी आज दि. ३१/०१/२०२५ रोजी त्यांच्या सांगली जिल्हयाच्या दौ-या दरम्यान पोलीस अधीक्षक कार्यालय, सांगली येथे भेट दिली. या भेटी वेळी त्यांनी मा. पोलीस अधीक्षक, सांगली, मा. अपर पोलीस अधीक्षक, सांगली, पोलीस उपअधीक्षक (गृह) व जिल्हयातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे सोबत बैठक घेतली. या बैठकीमध्ये सांगली जिल्हयातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेवून गुन्हयांबाबत माहिती घेतली.



सदर बैठकी वेळी मा. पोलीस अधीक्षक, सांगली यांनी सन २०२४ मधील सांगली जिल्हयातील गुन्हयांचा आढावा सादर करून पोलीसांनी केलेल्या कारवाई बाबतची विस्तृत माहिती सादर करून सांगली जिल्हा पोलीस दलाकडून राबविण्यात येत असलेल्या विविध कार्यक्रम व योजनांची माहिती सादर केली.
अंमली पदार्थ मुक्त सांगली यावर अधिक लक्ष देणेबाबत तसेच अंमली पदार्थावर पोलीस विभागाकडून कठोर कारवाई करणेबाबत व अशा प्रकरणामध्ये कोणीचीही गय न करता दोषींवर कडक कारवाई करणेबाबत मा. पालकमंत्री यांनी आदेशित केले आहे. अमंली पदार्थाना तरूण पिढी बळू पडू नये म्हणून या क्षेत्रात काम करणा-या विविध संघटनांनी पुढाकार घेवून वेगवेगळ्या उपायांच्या माध्यमातून लोकांमध्ये जास्तीत जास्त जनजागृती निमार्ण करावी. यासाठी आवश्यक तो खर्च शासनामार्फत केला जाईल याची ना. पालकमंत्री यांनी ग्वाही दिली. तसेच अंमली पदार्थाबाबतची गोपनीय माहिती नागरिकांनी पोलीसांना देवून सहकार्य करावे असे आवाहन मा. पालकमंत्री यांनी केले. अशी महिती देणा-याचे नाव पोलीसांकडून गुप्त ठेवले जाईल याबाबत त्यांनी खात्री दिली.
या बैठकी दरम्यान मा. पोलीस अधीक्षक, सांगली व मा. अपर पोलीस अधीक्षक, सांगली यांचे मार्गदर्शनाखाली केलेल्या विटा येथील ३० कोटी एम. डी. ड्रग्ज कारवाईबाबत मा. पालकमंत्री यांनी सांगली पोलीस दलाचे अभिनंदन करून सदर कारवाई करीता स्था. गु. अ. शाखा, सांगली कडील पोलीस निरीक्षक, सतिश शिंदे, सहा. पोलीस निरीक्षक, पंकज पवार, पोहेकों / सागर टिंगरे, नागेश खरात व स्टाफ यांना प्रशस्तीपत्र देवून त्यांचा गौरव करण्यात आला.