मा. न्यायालयाचे परवानगीने पोलीस अधीक्षक, गोंदिया यांच्या निर्देशांन्वये जप्त व बेवारस वाहनाचा जाहीर लिलाव पोलीस मुख्यालय कारंजा गोंदिया येथे संपन्न..

सह संपादक – रणजित मस्के
गोंदिया
🔹 याबाबत थोडक्यात माहिती अशी की, गोंदिया जिल्ह्यातील पोलीस स्टेशन गोंदिया शहर, गोंदिया ग्रामीण, रामनगर, रावणवाडी ला विविध गुन्ह्यात जप्त व बेवारस असलेली एकूण 118 वाहने ज्यात 117 मोटर सायकल, व 1 चारचाकी अशी वाहने भंगार स्थितीत पडून होती…. सदर वाहनाचे जाहीर लिलाव संबंधात मा. न्यायालय, गोंदिया तसेच उपविभागीय दंडाधिकारी गोंदिया, तिरोडा यांचे आदेश प्राप्त झाले असल्याने सदर संबंधात दिनांक 5 एप्रिल 2025 रोजी जाहिरात प्रकाशित करून दिनांक 09 एप्रिल 2025 रोजी पोलीस मुख्यालय कारंजा गोंदिया येथे सकाळी 10.00 वाजता लिलाव प्रक्रिया करण्याचे नियोजन कळविण्यात आले होते…




या अनुषंगाने मा. पोलीस अधीक्षक गोंदिया श्री. गोरख भामरे यांचे अध्यक्षतेत व प्रमुख उपस्थित आज दिनांक 09 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10 ते 12 वाजता दरम्यान पोलीस मुख्यालय, कारंजा गोंदिया येथे जप्त व बेवारस वाहनांचा जाहीर लिलाव पार पाडण्यात आला.. यामध्ये भंडारा तसेच गोंदिया जिल्ह्यातील 53 व्यावसायिक लोकांनी सहभाग नोंदविला होता.. जप्त व बेवारस 118 वाहनांची मूल्यांकन रक्कम 1,03,450/- रुपये आरटीओ विभाग यांनी निर्धारित केली होती..... लिलाव प्रक्रियेत सहभागी व्यावसायिक यांनी 5000/- रुपये अनामत रक्कम भरून बोली लावून लिलावात सहभाग नोंदविला... वाहनाचे जाहीर लिलाव दरम्यान श्री. कलाम हनीफ खान राहणार बाबा मस्तान शाह वॉर्ड, भंडारा यांनी 118 वाहनांची महत्तम बोली 6,91,000/- रुपये लावल्याने त्यांना जप्त व बेवारस संपुर्ण वाहने देण्यात आली..... संपुर्ण लिलाव कारवाई प्रक्रिया मा. पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनात व पंच कमिटी च्या उपस्थितीत पार पाडण्यात आले..
वाहनाचे जाहीर लिलाव प्रक्रिये दरम्यान प्रामुख्याने अध्यक्ष म्हणून पोलीस अधीक्षक गोंदिया श्री. गोरख भामरे, कमिटी सदस्य पोलीस उपअधीक्षक गृह श्रीमती नंदिनी चांदपूरकर, श्री संतोष गेडाम, कार्यालय अधीक्षक, पोलीस निरीक्षक श्री दिनेश लबडे स्थागुशा, श्री इमरान शेख, प्रबंधक श्री विनोद बोपचे, लेखापाल, शासकीय पंच श्री गिरीश दखणे , श्री मोहित पटले , जिल्हा परिषद गोंदिया तसेच ईतर अधिकारी अंमलदार यांचे उपस्थितीत लिलाव प्रक्रिया पार पाडण्यात आली.