मा. मुख्यमंत्री, म. रा. मुंबई यांचे संकल्पनेतील ” १०० दिवस कृती आराखडा ” अंतर्गत महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेच्या गुन्हयातील मौल्यवान मुद्देमाल फिर्यादीला केला परत…

0
Spread the love

सह संपादक – रणजित मस्के

पुणे


संकल्पना राचवणारे पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार

मा. श्री. संदीप पुगे, पोलीस अधीक्षक, सांगली

मा. श्रीमती रितू खोखर, अपर पोलीस अधिक्षक, सांगली

मा. श्री. प्रणिल मिल्डा, उपविभागीय पोलीस अधिकारी, मिरज विभाग

श्री. संदीप शिंदे, सहा. पोलीस निरीक्षक, प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरज

यांचे मार्गदर्शनाखाली

पोलीस उपनिरीक्षक श्री. संदीप गुख, पोलीस हेडकॉन्स्टेबल सर्जेराव पवार, सचिन कुंभार, अभिजीत पाटील, साक्षी पतंगे, पोलीस कॉन्स्टेबल सुनिल माने

थोडक्यात हकीकत

विविध शासकीय कार्यालयातील कामकाजाचा दर्जा वृद्धींगत व्हावा, प्रशासकीय कामकाज गतीमान व्हावे तसेच प्रशासकीय कामकाजामध्ये सुसूत्रता यावी यासाठी मा. मुख्यमंत्री, म. रा. मुंबई यांचे संकल्पनेतील १०० दिवस कृती आराखडा ” योजना संपूर्ण राज्यभर राबविण्यात येत आहे. सदर योजना सांगली जिल्हयामध्ये प्रभावीपणे राबविणेचाबत मा. श्री. संदीप घुगे, पोलीस अधीक्षक, सांगली यांनी जिल्हयातील सर्व पोलीस ठाणेस आदेश दिले होते.

मा. श्री. संदीप घुगे, पोलीस अधीक्षक, सांगली, मा. श्रीमती रितू खोखर, अपर पोलीस अधिक्षक, सांगली तसेच मा. श्री. प्रणिल गिल्डा, उपविभागीय पोलीस अधिकारी, मिरज विभाग यांचे मार्गदर्शनाखाली संदीप शिंदे, सहा. पोलीस निरीक्षक, प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरज वांनी १०० दिवस कृती आराखडा ही संकल्पना प्रभावीपणे राबविणेसाठी कारवाई करीत मुद्देमाल निर्गती या प्रवर्गाखाली कारवाई करणेचाबत आदेशीत केले होते.

त्याअनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरज कडील पोलीस अधिकारी व अंमलदार वांचे पथकाने कार्यवाही करीत सतत पाठपुरावा करुन महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे गु.र.नं. १२२/२०२२, भादंविसं कलम ४५४, ४५७, ३८० या गुन्हयातील आरोपी याचेकडून तपासादरम्यान जप्त केलेले एकूण १,९५,०००/- रु. किंमतीचे ३१.७६० ग्रॅम वजनाचे एक सोन्याचे भंगळसूत्र मा. न्यायालयाकडून आदेश पारीत करुन घेवून सदर गुन्हयातील फिर्यादी नामे संगीता बंडू चौगुले, रा. विद्यानगर, मिरज यांना परत करुन सा. मुख्यमंत्री साो., म.रा. मुंबई यांचे संकल्पनेतील १०० दिवस कृती आराखडा योजनेची प्रभावी अंमलबजावणी केली आहे.

सहा. पोलीस निरीक्षक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट